PUNE CRIME : परदेशातील नोकरीसाठी सोशल साइट्सचा वापर करताना सावधान! अनेकांना घातला जातोय लाखोंचा गंडा

359 0

परदेशात नोकरी करायचीये ? परदेशात नोकरी करण्यासाठी सोशल साइट्सचा वापर करताय ? तुम्हाला परदेशात नोकरी मिळवून देण्यासाठी मी मदत करतो, अशा प्रलोभनाला भूलताय ? मग सावधान ! तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते. परदेशात नोकरी देण्याच्या बहाण्यानं आर्थिक गंडा घालणाऱ्या टोळीविषयी सावध करणारा Top News Marathi चा हा स्पेशल रिपोर्ट एकदा पाहाच…

एखादी संस्था किंवा व्यक्ती परदेशात नोकरी मिळवून देण्यासाठी पैशांची मागणी करत असेल तर आपली फसवणूक होतेय हे लक्षात घ्या. कोणतीही परदेशी कंपनी नोकरी मिळवून देण्यासाठी पैशांची मागणी करत नाही. परदेशात जाऊन स्वतःच्या मेहनतीनं जर तुम्ही पैसे कमावणार असाल तर त्यासाठी कोणत्याही खाजगी संस्थेला पैसे देण्याची गरज नाही. शिवाय तुम्ही कमावलेली कमाई ही केवळ तुमचीच आहे. परदेशातील नोकरीचं आमिष दाखवून पैसे मिळाल्यावर संस्थेकडून नंतर फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते. तेव्हा परदेशातील नोकरीसाठी कुणालाही पैसे देऊ नका.

परदेशात चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देतो, असं आमिष दाखवून चौघांनी मिळून अनेकांना गंडा घातल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आलाय. या प्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अनेकांची फसवणूक झाल्याचीही शक्यता आहे. या प्रकरणाविषयी लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम आणि पोलीस निरीक्षक प्रियांका शेळके यांनी काय माहिती दिलीये पाहूयात…

नोकरीसंदर्भात सोशल मीडियावर आलेल्या जाहिराती नीट तपासून खात्री करून घ्या आणि पैशांची देवाणघेवाण करताना कुणावरही पटकन विश्वास ठेवू नका. अन्यथा तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते.

परदेशात चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देतो, असं आमिष दाखवून चौघांनी मिळून अनेकांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अनेकांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे.

नोकरीसंदर्भात सोशल मीडियावर आलेल्या जाहिराती नीट तपासून खात्री करून घ्या आणि पैशांची देवाणघेवाण करताना कुणावरही पटकन विश्वास ठेवू नका. अन्यथा आर्थिक फसवणूक होऊ शकते.

Share This News

Related Post

Hadapsar News

Hadapsar News : पतीसमोरच पत्नीवर बलात्कार करणाऱ्या आरोपी सावकाराची भर पावसात हडपसर पोलिसांनी काढली धिंड !

Posted by - July 28, 2023 0
पुणे : 2 दिवसांपूर्वी पुण्यातील हडपसर (Hadapsar News) या ठिकाणी उसने घेतलेले पैसे परत न दिल्याने खाजगी सावकाराने एका व्यक्तीच्या…
Devendra Fadanvis

Devendra Fadanvis : पुरग्रस्तांच्या भेटीला गेलेल्या फडणवीसांकडे पुरग्रस्तांनी केली ‘ही’ मागणी

Posted by - September 24, 2023 0
नागपूर : उपमुख्यमंत्री आणि नागपुरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीची आज पाहणी केली. अंबाझरी तलाव परिसरातून…

पुणे विमानतळाचे स्थलांतर करणार नाही, खासदार गिरीश बापट यांची माहिती

Posted by - March 24, 2022 0
पुणे- विमानतळाचे स्थलांतर अजिबात करणार नाही. याठिकाणीच प्रवाशांच्या सुविधेसाठी वाढ करण्यात येणार आहे, असे विमानतळ सल्लागार समितीचे अध्यक्ष आणि खासदार…

आव्हाडांच्या शुभेच्छांवर अण्णांचे सणसणीत उत्तर, काय म्हणाले अण्णा हजारे ?

Posted by - June 15, 2022 0
अहमदनगर – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा आज वाढदिवस. या निमित्त राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अण्णा हजारे यांना…

धनुष्यबाण कुणाचा ? निर्णय लांबणीवर..! मग अंधेरी निवडणुकीचे काय ?

Posted by - October 7, 2022 0
मुंबई : निवडणूक आयोगामार्फत आज धनुष्यबाण हे चिन्ह नक्की कुणाचं हा महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता होती. मात्र सध्यातरी हा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *