#CYBER CRIME : कोणतेही नवीन AAP डाउनलोड करताना सावधान; सायबर चोरट्यांचा नवा फंडा; AAP डाउनलोड करताच ….

643 0

सायबर क्राईम : ऑनलाईन फसवणुकीनंतर आता अॅपच्या माध्यमातून फसवणूक करण्याचे नवे फंडे गुन्हेगारांनी शोधून काढले आहेत. मुंबईतील अंधेरी येथे राहणाऱ्या 65 वर्षीय मानसी मुळे या अशाच अॅपच्या फसवणुकीची बळी ठरल्या. 

महिलेने दिलेल्या माहितीनुसार, 20 मार्च रोजी तिच्या पतीच्या मोबाईलवर एक मेसेज आला. या मॅसेजमध्ये मागील महिन्याचे वीज बिल जमा केले नाही, असे लिहिले होते. जर बिल भरले नाही तर त्याचे वीज कनेक्शन तोडले जाईल. काही अडचण आल्यास संपर्क करण्यासाठी या मेसेजसोबत एक नंबरही देण्यात आला होता.

मेसेज वाचताच तिने त्या नंबरवर कॉल केला. फोनवर समोरच्या व्यक्तीने अदानी इलेक्ट्रिसिटी ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगितले. गेल्या महिन्याचे बिल भरले नसल्याचे त्यांनी सांगितले. यावर मानसी यांनी बिल भरल्याचे सांगितले. यानंतर समोरच्या व्यक्तीने बिल ऑनलाइन दिसत नसल्याचे सांगितले. तसेच “टीम व्ह्यूअर क्विक सपोर्ट” अॅप डाउनलोड करण्यास सांगितले.

मानसी यांनी अॅप डाउनलोड केले. अॅपवर त्यांची जुनी बिले दिसू लागली. त्यानंतर काही वेळाने मानसी यांच्या मोबाईलवर तीन वेगवेगळे मेसेज आले. या मॅसेजमध्ये खात्यातून पैसे काढले गेल्याचे लिहिले होते. त्या खात्यातून तीन वेळा एकूण 6 लाख 91 हजार 859 रुपये डेबिट झाले होते.

सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या खात्यातून तब्बल 6,91,859 रुपये चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. मानसी यांनी अंधेरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध आयपीसी कलम 420 (फसवणूक), माहिती कायदा कलम 66(सी) आणि 66(डी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

 

Share This News

Related Post

सामाजिक चळवळीचा बुलंद आवाज, धडाडीचे नेतृत्व हरपले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Posted by - August 14, 2022 0
मुंबई:- शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक, माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन अत्यंत धक्कादायक आणि वेदना देणारे आहे. त्यांच्या निधनाने मराठा…

गद्दारांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम करणार ! संजय राऊत यांचा इशारा

Posted by - June 28, 2022 0
अलिबाग- महाराष्ट्रात शिवसेना संपवण्याचे कारस्थान सुरू आहे. 56 वर्षे शिवसेना उभी आहे. शिवसेनेचा इतिहास आहे ज्यांनी बाळासाहेबांशी गद्दारी केले त्याचे…

मोठी बातमी ! राजद्रोहाचे कलम तूर्तास स्थगित, सुप्रिम कोर्टाचा केंद्र सरकारला आदेश

Posted by - May 11, 2022 0
नवी दिल्ली- राजद्रोह कालमाबाबत सुप्रीम कोर्टाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. कोर्टाच्या आदेशानुसार राजद्रोहाचं कलम 124 अ तूर्तास स्थगित करण्यात आलं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *