ब्रेकिंग न्यूज- ज्येष्ठ संगीतकार बप्पी लाहिरी यांचे मुंबईत निधन

247 0

मुंबई- तरुणाईला डिस्को डान्सवर थिरकायला लावणारे ज्येष्ठ संगीतकार बप्पी लाहिरी उर्फ आलोकेश लाहिरी यांचे निधन झाले. मुंबईत जुहू येथील क्रिटी केअर हॉस्पिटमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

मागील 29 दिवस बप्पी लाहिरी हे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. सोमवारी त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला होता. पण घरी आल्यानंतर त्यांनी प्रकृती पुन्हा बिघडली. त्यामुळे त्यांना पुन्हा रूग्णालयात दाखल करावं लागलं.

बाप्पी यांनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी लोकप्रिय ठरली आहेत. बप्पी लाहिरी हे आपल्या वेगळ्या शैलीसाठी प्रसिद्ध होते. तम्मा तम्मा लोगे, डिस्को डान्सर, याद आ रहा है तेरा प्यार ही सुपर हिट गाणी बप्पी लाहरी यांनी गायली आहेत. त्यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1952 रोजी पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे झाला. आपल्या हटक्या शैलीनं त्यांनी बॉलीवूड आणि संगीत क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. 1973 साली त्यांनी नन्हा शिकारी या चित्रपटापासून बॉलिवुडमधील करीअरला सुरुवात केली.

बप्पी लाहिरी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या हटक्या संगीताने छाप सोडली. ऐंशी-नव्वदीच्या दशकात त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांना तरुणाईला वेड लावले होते. त्यांच्या संगीतातील ही जादू कायम होती. ‘डर्टी पिक्चर’ या चित्रपटात त्यांनी संगीतबद्ध आणि पार्श्वगायन केलेल्या ‘उ लाला’ हे गाणंही चांगलंच लोकप्रिय ठरलं. 2021 मध्ये बप्पी लहिरी यांना कोरोनाची लागण झाली होती. परंतू त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली.

Share This News

Related Post

Sharad Pawar

Sharad Pawar NCP : नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार; शरद पवार गटाला मिळाले नवे नाव

Posted by - February 7, 2024 0
केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव (Sharad Pawar NCP) आणि चिन्हावर महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या निकालात उपमुख्यमंत्री अजित…

‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ : पुनित बालन ग्रुप संघाचा विजयाचा चौकार; ब्रेव्हहार्ट क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा पहिला विजय

Posted by - November 30, 2022 0
पुणे : बालन ग्रुप तर्फे आयोजित दुसर्‍या ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत पुनित बालन ग्रुप संघाने स्पर्धेत…
Prajakta Mali

Prajakta Mali : प्राजक्ता माळी झळकणार ‘या’ चित्रपटात; पोस्ट शेअर करत म्हणाली “दुनिया गेली तेल लावत…”

Posted by - August 24, 2023 0
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात (Prajakta Mali) एक वेगळी जागा निर्माण केली आहे.…

राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून पुरस्कार ; २ सप्टेंबरपूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन

Posted by - August 31, 2022 0
पुणे : यावर्षीच्या गणेशोत्सवाकरीता राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धा घेऊन पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य…

भीमसेन जोशी यांनी जगाला आवाज दाखवला – जावेद अख्तर ; २० व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे भव्य सोहळ्यात उद्घाटन 

Posted by - March 4, 2022 0
‘भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी जगाला आवाज दाखवला,’ अशा शब्दांमध्ये गीतकार, पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी भीमसेन जोशी यांना आदरांजली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *