भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांची ऑडिओ क्लिप प्रकरणी चौकशी सुरु

150 0

औरंगाबाद- माजी मंत्री आणि भाजप नेते बबनराव लोणीकर यांच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी चौकशी सुरु करण्यात आली आहे. तसेच लोणीकर यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीची तक्रारही दाखल करण्यात आली आहे. दलित समाजाचा अपमान केल्यामुळे अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

लोणीकर यांनी एका वीज अभियंत्याला फोनवरून शिविगाळ केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. लोणीकर यांच्या बंगल्यातील विजेचे मीटर काढून नेल्याच्या कारणास्तव लोणीकर यांनी वीज अभियंता दादासाहेब काळे यांना शिवीगाळ केल्याचे या ऑडिओ क्लिपमधून ऐकू येत आहे. मात्र दादासाहेब काळे याणी आपण वीज मीटर काढून नेला नसल्याचे सांगत आहेत.

या संवादाची ओडिओ क्लिप समोर आल्यानंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार आता या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आल्याची माहिती महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश गोंदवले यांनी यांनी दिली आहे.

इतकंच नाही तर लोणीकर यांच्या विरोधात गुणरत्न सोनवणे आणि नागराज गायकवाड या दोघांनी औरंगाबाद पोलीस आयुक्त कार्यालयात दलित समाजाचा अपमान केल्यामुळे अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. .

Share This News

Related Post

‘जी-२०’ परिषदेच्या निमित्ताने पुणे, महाराष्ट्र आणि देशाची क्षमता दाखविण्याची चांगली संधी- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Posted by - January 9, 2023 0
पुणे : ‘जी-२०’ परिषदेच्या निमित्ताने पुणे, महाराष्ट्र आणि देशाची क्षमता दाखविण्याची चांगली संधी आपल्याला मिळाली असून सर्व प्रशासकीय यंत्रणांनी उत्तम…

केस गळतीने हैराण झाले आहात ? या घरगुती उपायांनी केवळ आठ दिवसात थांबू शकते केस गळती

Posted by - October 11, 2022 0
केस गळणे हा आजार नसून केवळ एक समस्या आहे. केस गळतीची अनेक कारणे असतात. यामध्ये प्रामुख्याने प्रदूषण, ताणतणाव, कोंडा किंवा…

चांदणी चौकातील उड्डाणपूलाच्या कामाला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची भेट; काम वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश

Posted by - November 2, 2022 0
पुणे : चांदणी चौकातील एकात्मिक उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामाला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी भेट देऊन पाहणी केली. या प्रकल्पाचे काम…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपुरातील RSS च्या आद्य सरसंघचालक डॉ. हेगडेवार यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन केले वंदन

Posted by - December 29, 2022 0
नागपूर : आज नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेगडेवार यांच्या स्मृतीस्थळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
Rohit Pawar

Rohit Pawar : सरळसेवा भरतीसाठी One Time Registration पद्धत सुरु करा; रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Posted by - August 30, 2023 0
मुंबई : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांची ‘एक परीक्षा एक कट ऑफ’ ही एकच आग्रही मागणी आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *