मोठी बातमी! उद्योगपती अविनाश भोसले यांना 8 जून पर्यंत सीबीआय कोठडी

216 0

पुणे- प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले यांना आजही न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. त्यांना 8 जूनपर्यंत सीबीआय कोठडी देण्यात आली आहे.

डीएचएफएल आणि येस बँक प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने आज सुनावणी केली. दरम्यान अविनाश भोसले यांना 26 मे रोजी सीबीआयने अटक केली होती. डीएचएफएल आणि येस बँक घोटाळा प्रकरणात त्यांना अटक केली आहे. त्याअगोदरही त्यांची ईडी आणि सीबीआयकडून चौकशी करण्यात आली होती. त्यांना अटक करण्यात आल्यावर आज त्यांच्या या प्रकरणावर विशेष सीबीआय कोर्टात सुनावणी पार पडली आहे.

कोण आहेत अविनाश भोसले ?

अविनाश भोसले यांची बांधकाम व्यावसायिक म्हणून पुण्यासह राज्यातील विविध भागांत ओळख आहे. तसंच व्यवसायासोबतच राजकीय नेत्यांसोबतच्या संबंधांमुळेही भोसले चर्चेत असतात. काँग्रेस नेते आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे ते सासरे आहेत. मात्र भोसले यांचा सर्वच राजकीय पक्षांतील नेत्यांसोबत संपर्क असल्याचं बोललं जातं.

नगर जिल्ह्यातील संगमनेर शहरातून अविनाश भोसले रोजगाराच्या शोधात पुण्यात आले. त्यांनी रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. रास्ता पेठ भागात ते भाड्याच्या घरात राहायचे. कालांतरानं त्यांनी रिक्षा भाड्यानं देण्याचा व्यवसाय सुरू केला. पुढे भोसलेंची ओळख बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींशी झाली. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील काहींच्या माध्यमातून त्यांना रस्त्याची कंत्राटं मिळू लागली.

पुण्यातील बाणेरमध्ये भोसलेंचा व्हाईट हाऊस बंगला आहे. हाऊसच्या टेरेसवर भोसलेंच्या मालकीचं हेलिकॉप्टरदेखील आहे. रिक्षा व्यवसाय ते स्वत:चं हेलिकॉप्टर हा भोसले यांचा प्रवास थक्क करणारा आहे. विशेष म्हणजे अल्पावधीत त्यांना हा प्रवास केला आहे.

Share This News

Related Post

Ahmednagar Accident

Ahmednagar Accident : अहमदनगरमध्ये ट्रक-टँकरचा भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू

Posted by - October 17, 2023 0
अहमदनगर : राज्यात अपघाताचे (Ahmednagar Accident) प्रमाण काही थांबायचे नाव घेईना. अहमदनगर जिल्ह्यातून अशीच एक अपघाताची घटना समोर आली आहे.…

Gang rape case : यूपीतील माजी सपा आमदार विजय मिश्रा यांच्या मुलाला पुण्यात ठोकल्या बेड्या ; एक वर्षापासून होता फरार …

Posted by - July 25, 2022 0
उत्तर प्रदेश : सामूहिक बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी विष्णू मिश्रा याला पुण्यात हडपसर परिसरातील ऑक्सिजन विला या आलिशान इमारतीतुन ताब्यात…

दुर्दैवी : मुसळधार पावसामुळे पुण्यात झाड पडून एका रिक्षा चालकाचा मृत्यू

Posted by - September 30, 2022 0
पुणे : चार वाजता सुमारास पुण्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली. विजेच्या कडकडाटात जोरदार पाऊस पडल्यामुळे पुण्यातील विविध भागांमध्ये झाडपडीचा घटना…
Cabinet Expansion

Cabinet expansion : अखेर खातेवाटप जाहीर; अजित पवारांना अर्थ खाते तर धनंजय मुंडेना कृषी खाते

Posted by - July 14, 2023 0
मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप…

पुणे गुरुवारी शहराच्या या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद

Posted by - November 7, 2022 0
पुणे : गुरुवारी वारजे जलकेंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या गांधी भवन पाण्याच्या टाकीचे त्यासह चांदणी चौकातील पाण्याच्या टाकीच्या मुख्य जलवाहिनीला स्लो मीटर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *