Breaking News ! पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयकडून अटक

375 0

पुणे- पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना DHFL प्रकरणी सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. अविनाश भोसले यांची यापूर्वी ईडी आणि सीबीआयनं चौकशी केली होती. 

एप्रिल महिन्यात अविनाश भोसले यांच्या घरी आणि अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडशी संबंधित असलेल्या ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली होती. मुंबई आणि पुण्यातील 8 ठिकाणी ही छापेमारी झाली होती. व्यावसायिक आणि रेडियस ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक संजय छाब्रिया यांना येस बँक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने अटक केली होती. या अटकेशी संबंधित ही छापेमारी होती.

अविनाश भोसले यांच्यावर ईडीनं गेल्यावर्षी कारवाई केली होती. अविनाश भोसले यांची ४० कोटींची संपत्ती गेल्यावर्षी जूनमध्ये जप्त करण्यात आली होती. अविनाश भोसले यांच्या व्यावसायिक भागीदारांवर देखील छापे टाकण्यात आले होते. डीएचएफएल येस बँक लोन प्रकरणी अविनाश भोसले यांच्यावर सीबीआयनं ही कारवाई केली आहे. सीबीआयनं अटकेची कारवाई करण्यापूर्वी ३० एप्रिल रोजी छापे टाकण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. अविनाश भोसले यांचे मित्र आणि व्यावसायिक भागीदार यांच्यावर देखील सीबीआयनं छापे टाकले होते. मुंबईतील मालाडमध्ये सीबीआयनं छापे टाकले होते, अशी माहिती आहे. सीबीआयनं ३० एप्रिलला ८ ठिकाणी छापे टाकले होते. अविनाश भोसले हे एबीआयल ग्रुपचे मालक आहेत.

कोण आहेत अविनाश भोसले?

अविनाश भोसले हे पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. रिअल इस्टेट किंग अशीही त्यांची ओळख आहे. अविनाश भोसले हे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत. कोट्यवधी रूपयांचा एबीआयएल ग्रुपचे ते मालक आहेत. आता बांधकाम क्षेत्राशी संबंधित शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर झालेली कारवाई ताजी असतानाच ईडीने भोसले यांच्यावरही कारवाईचे पाऊल उचलल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Share This News

Related Post

Nagpur

नागपूरमध्ये कार डिव्हायडरला धडकून भीषण अपघात

Posted by - May 23, 2023 0
नागपूर : नागपूरमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील न्यू हायवे स्टार ढाब्यासमोर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले…

विधानपरिषद निवडणुकीचा पूर्ण निकाल ; वाचा सविस्तर कुणाला किती मतं मिळाली?

Posted by - June 20, 2022 0
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या विधान परिषद निवडणुकीचा निकाल अखेर लागला आहे. या निवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असे…

#HEALTH TIPS : झोपताना तुम्ही करताय का ‘या’ चुका ? आजच तपासा अन्यथा अनेक गंभीर आजारांना मिळते आमंत्रण

Posted by - March 27, 2023 0
झोप आपल्या आरोग्यासाठी आणि संपूर्ण आयुष्यासाठी खूप महत्त्वाची आहे, तरीही त्याकडे सर्वाधिक दुर्लक्ष केले जाते. जर एक रात्र पूर्ण झाली…

कृरतेचा कळस ; फावड्यानं चिरला गळा, पत्नीच्या हत्येनंतर देखील पतीच्या ‘त्या’ कृत्याने गावात संतापाची लाट

Posted by - September 29, 2022 0
राग हा व्यक्तीच्या मनामध्ये साचत राहिला तर त्याचे केव्हा रुद्ररूप होऊन भडका होऊ शकतो हे सांगता येत नाही. पण कधी…

तेजोमयी वातावरणात तळेगावात साकारले पंढरपूर! दीपोत्सवात उजळले श्री डोळसनाथ महाराज मंदिर!

Posted by - November 8, 2022 0
तळेगाव दाभाडे : ‘दिवे लागले रे, दिवेलागले तमाच्या तळाशी दिवे लागले या उक्तीप्रमाणे जीवनातील अंधःकार दूर सारून आपले आत्मरूप जागविण्याची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *