औरंगजेबाची कंबर पाच दिवसांसाठी बंद, पुरातत्व विभागाने घेतला निर्णय

384 0

औरंगाबाद- औरंगाबाद येथील खुल्ताबाद येथे असलेली औरंगजेबाची कबर पर्यटकांसाठी पाच दिवसांसाठी बंद ठेवण्यात आलेली आहे. औरंगजेब कबर कमिटीच्या मागणीनंतर पुरातत्त्व खात्याने हा निर्णय घेतला आहे.

एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी आणि खासदार इम्तियाज जलील यांनी १२ मे रोजी औरंगजेबाच्या कबरीच्या दर्शन घेतल्यानंतर राज्यात प्रचंड वाद निर्माण झाला होता. त्यावर सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षाने देखील तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला होता. छत्रपती संभाजी महाराजांची क्रूर हत्या करणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीवर जाण्याची गरज काय आहे? असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे कंबर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यासाठी औरंगजेब कबर कमिटीने यासाठी पुरातत्त्व विभागाकडे मागणी केली होती. त्यानंतर पुरातत्त्व विभागाकडून राज्यातील सद्यस्थिती पाहता औरंगजेबाची कबर पर्यटकांसाठी पाच दिवस बंद ठेवण्यात आली आहे. औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात कशाला पाहिजे असा सवाल मनसेने केल्यावर कबर परिसरातील सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. सध्या औरंगजेबाच्या कबर परिसरात बंदुकधारी पोलिसही तैनात करण्यात आले आहेत.

 

 

Share This News

Related Post

लोणावळ्यातील वाहतूकीबाबत वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

Posted by - January 12, 2023 0
पुणे : लोणावळा शहरातील वाहतूक समस्येविषयी शास्त्रशुद्ध पध्दतीने अभ्यास करुन वाहतूक व्यवस्थापन आराखडा आठवड्याभरात तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश…

कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध टाकून बेशुद्ध करून महिलेवर बलात्कार, हिंजवडीमधील घटना

Posted by - May 24, 2022 0
पिंपरी- काहीतरी बोलण्याचे निमित्त सांगून महिलेला घरी आणले. तिला कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध टाकून बेशुद्ध केले आणि तिच्यावर बलात्कार केला. ही…
Prakash Ambedkar

Loksabha Elections : काँग्रेसच्या ‘या’ उमेदवाराला प्रकाश आंबेडकरांनी दिला पाठिंबा

Posted by - March 23, 2024 0
मुंबई : महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) जागावाटपाचा महाविकासआघाडी आणि महायुतीचा तिढा अजूनही कायम आहे. आतापर्यंत भाजपने 20 तर काँग्रेसने…
Gondia News

Gondia News : गोंदिया हळहळलं ! 3 शिक्षक मित्रांचा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू

Posted by - August 16, 2023 0
गोंदिया : गोंदियामधून (Gondia News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गोंदिया (Gondia News) जिल्ह्यात मोठी खळबळ…

EWS आरक्षण हा बौद्धिकदृष्ट्या भ्रष्ट निर्णय, मागच्या दाराने मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न : ॲड. प्रकाश आंबेडकर

Posted by - November 8, 2022 0
EWS आरक्षणावरती सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. हा निकाल पाहता हा वैचारिक भ्रष्टाचार आहे असेच याबद्दल म्हणता येईल. मागच्या दाराने पुन्हा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *