Atul Bedekar

Atul Bedekar : व्ही पी. बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांचे निधन

1372 0

मुंबई : व्ही पी. बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर (Atul Bedekar) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. ते 56 वर्षांचे होते. बेडेकर हे लोणची, मसाले व चटणी या पारंपारिक मराठी खाद्यपदार्थ व्यवसायातील प्रतिष्ठित नाव आहे. यामुळे उद्योग क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

1910 साली विश्वनाथ पर्शराम बेडेकर यांनी गिरगावात लहानसं किराणामालाचं दुकान सुरू केलं. त्याच दुकानात त्यांनी मसाले आणि लोणची ठेवण्यास सुरूवात केली. मसाले लोणची यांचा खप भरपूर व्हायला लागल्यावर दुकानांच्या शाखा काढायला सुरूवात केली. मुगभाट, दादर, फोर्टमध्ये माणकेश्वर मंदिराजवळ बेडेकरांची अल्पावधीतच पाच दुकाने झाली. पुढे धंद्याचा व्याप वाढता राहिल्यावर 1943 मध्येच ‘व्ही. पी. बेडेकर आणि सन्स लिमिटेड’ असं कंपनीचं नामकरण करण्यात आले. कालांतराने हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला आणि बेडेकर मसाले हा एक मोठा ब्रँड तयार झाला.

फक्त देशात नाही तर ज्या ज्या देशात मराठी माणूस पोहचला तिथे तिथे अ बेडेकर उत्पादनंही पोहचली. 1960 साली भारतात प्रथम पी. पी. लीक प्रूफ कॅप्स बेडेकरांनी वापरल्या. आणि मग लोणचं निर्यात होऊ लागलं.कर्जतच्या फॅक्टरीत जवळपास 600 टन लोणचं सीझनला बनतं.महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये याची विक्री केली जाते. अमेरिका, कॅनडा, मध्य पूर्व, ऑस्ट्रेलिया, युरोप आणि पूर्वेकडील देशांमध्येदेखील हा ब्रँड पोहोचला आहे.

Share This News

Related Post

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील परिचारिका भरती प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती

Posted by - July 12, 2022 0
पुणे: पिंपरी-चिंचवड महापालिकेतील परिचारिका भरती प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयानं तातडीची स्थगिती दिली आहे. महापालिकेत 15- 16 वर्षापासून कंत्राटी पद्धतीनं काम…
Manoj Jarange

Manoj Jarange Patil : पत्रकार परिषदेत जरांगे पाटलांनी केल्या ‘या’ 3 मागण्या

Posted by - February 16, 2024 0
जालना : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) सगे सोयरे शब्दाच्या अंमलबजावणीच्या मागणीवर ठाम आहेत, त्यांनी सगे सोयरे शब्दाची अंमलबजावणी…

भारती विद्यापीठात इंडस्ट्री इन्स्टिट्यूट पार्टनरशिप समिट उत्साहात… पाहा

Posted by - September 19, 2022 0
पुणे : भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रेनरशिप डेव्हलपमेंट (IMED) द्वारे आयोजित इंडस्ट्री इन्स्टिट्यूट पार्टनरशिप समिट 2022…

बोरिवलीमध्ये 4 मजली इमारत कोसळली ; ढिगार्‍याखाली नागरिक अडकल्याची भीती ; बचाव कार्य सुरू

Posted by - August 19, 2022 0
बोरवलीमध्ये एक चार मजली इमारत कोसळल्याची माहिती समोर येते आहे . गीतांजली नामक ही इमारत बोरिवली पश्चिम भागातील साईनगर येथे…
Fire

पुण्यातील कल्याणीनगरमधील आयटी पार्कमध्ये भीषण आग

Posted by - May 29, 2023 0
पुणे : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये आयटी पार्कमध्ये भीषण आग लागली आहे. या आयटी पार्कमध्ये 300 कर्मचारी अडकले आहेत. या कर्मचाऱ्यांना बाहेर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *