Arrest

ब्रेकिंग न्यूज ! पुण्यातील तरुणाला एटीएस कडून अटक, दहशतवादी संघटनेकडून फंडिंग केल्याचा संशय

470 0

पुणे- दहशतवादी संघटनेकडून फंडिंग होत असल्याच्या संशयावरून पुण्यातील एका तरुणाला दहशतवाद विरोधी पथकाने दापोडी परिसरातून अटक केली.  जुनेद मोहम्मद (वय 18) असे तरुणाचे नाव आहे. हा तरुण जम्मू काश्मीरमधील एका अतिरेकी संघटनेच्या संपर्कात होता.

पुणे एटीएसने दिलेल्या माहितीनूसार, गझवाते अल हिंद या काश्मीरमधील अतिरेकी संघटनेने महिनाभरापुर्वीच या तरुणाच्या बँक खात्यात दहा हजार रुपये जमा केले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो या संघटनेच्या संपर्कात आला होता. हे पैसे नेमके कशासाठी होते ? या पैशाचे काय केले जाणार होते हे मात्र अद्याप समोर आले नाही. या तरुणाला आज पुणे न्यायालयात दुपारी हजर करण्यात येणार आहे.

जुनेद मोहम्मद हा अवघा 18 वर्षांचा असून तो बेरोजगार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो जम्मू काश्मीरमधील दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला होता. त्यानंतर राज्यात घातपाती कारवायांसाठी काश्मीरमधीलच एका संघटनेने त्याला महिनाभरापुर्वी 10 हजार रुपये पाठवले होते. त्याच्या बँक खात्यात हे पैसे टाकण्यात आले होते. काही दिवसांपासून एटीएस आरोपीच्या मागावर होते. अखेर त्याला दापोडी परिसरातून अटक करण्यात आली.

Share This News

Related Post

वाह रे पठ्या ! पुण्याजवळील या गावात शेतकऱ्यांनी केली गव्हाच्या शेतात अफूची लागवड; पोलिसांकडून 11 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Posted by - March 4, 2023 0
पुणे (होळकरवाडी) : पुण्यापासून काही अंतरावर असणाऱ्या होळकरवाडी या गावांमध्ये दोन शेतकऱ्यांनी चक्क गव्हाच्या शेतात अफूची लागवड केल्याचा प्रकार समोर…

MLA Pratap Sarnaik : “मुलं आणि सुनांच व्यवस्थित होऊ दे..”, तुळजाभवानी मातेला 51 तोळ्याच्या पादुका आणि 21 तोळ्याचा हार देऊन फेडला नवस

Posted by - November 24, 2022 0
उस्मानाबाद : शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आज सहकुटुंब तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवीला 75 तोळे सोनं…
Modi And Suprim Court

ED : ‘ईडी’ च्या प्रमुखांची सलग तीन वेळा दिलेली मुदतवाढ बेकायदा ! सर्वोच्च न्यायालयाचा मोदी सरकारला दणका

Posted by - July 12, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या काही वर्षांपासून देशभरात चर्चेचा विषय बनलेल्या सक्तवसुली महासंचालनालयाचे (ईडी) (ED) संचालक संजय मिश्रा यांना…

मोदी सरकारचा ‘रोजगार मेळावा’ निवडणुकीच्या तोंडावरचा केवळ एक इव्हेंट – अतुल लोंढे

Posted by - October 22, 2022 0
मुंबई:  केंद्रातील मोदी सरकार ७५ हजार जागांची नियुक्त पत्रे इच्छुक उमेदवारांना देत असल्याचा मोठा गाजावाजा करत आहे. परंतु यातील अनेक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *