चांदणी चौक पाडण्याचेवेळी मुंबई-बंगळुरू महामार्गावरील पुणे शहरातील वाहतूक रहाणार बंद ; वाचा वाहतूक बदल आणि पर्यायी मार्ग

361 0

पुणे : मुंबई- बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौकातील जुना पूल येत्या १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार आहे. हा पूल स्फोटकांद्वारे पाडण्यात येणार असल्याने या कामाच्यावेळी तसेच तेथील राडारोडा उचलण्याची कार्यवाही होईपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना तेथून प्रवास करण्यास मनाईबाबतचे आदेश पुणे शहरचे पोलीस उपायुक्त वाहतूक राहूल श्रीरामे यांनी जारी केले आहेत.

वाहतूकीतील बदल १ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते २ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत अथवा आवश्यकतेनुसार पूल पाडण्याचे काम पूर्ण होईपर्यंत अंमलात राहतील.

वाहतुकीतील बदल-
• मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील मुंबईकडून येणारी जड वाहतूक ही ऊर्से टोलनाका येथेच थांबविण्यात येणार आहे.

• साताऱ्याकडून येणारी जड वाहतूक ही खेड शिवापूर टोलनाक्याजवळ थांबविण्यात येणार आहे.

• मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील शिंदेवाडी ते ऊर्से टोलनाका या दरम्यान दोन्ही बाजूने सर्व प्रकारच्या जड वाहनांच्या वाहतूकीस बंदी करण्यात येणार आहे.

• मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील डुक्कर खिंड ते पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीतील घोडावत चौक या दरम्यान दोन्ही बाजून सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतूकीस बंदी राहील.

वाहतूकीसाठी पर्यायी मार्ग-

मुंबईकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या हलक्या व प्रवासी चारचाकी वाहनांकरीता-

• मुंबईकडून येणारी हलकी व प्रवासी चारचाकी वाहने ऊर्से टोलनाका येथून जुन्या पुणे- मुंबई रस्त्याने भक्ती शक्ती चौक, नाशिक फाटा, बोपोडी चौक, इंजिनीअरींग कॉलेज चौक, संचेती चौक, खंडोजीबाबा चौक, टिळक रोडने जेधे चौक, पुणे सातारा रोडने कात्रज चौक, सरळ जुना कात्रज बोगदामार्गे साताऱ्याकडे किंवा कात्रज चौक, नवले पूल डावीकडे वळून मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग

• वाकड चौक डावीकडे वळून राजीव गांधी पुलावरुन विद्यापीठ चौक, संचेती चौक, उजवीकडे वळून खंडोजीबाबा चौक, टिळक रोडने जेधे चौक, पुणे सातारा रोडने कात्रज चौक, सरळ जुना कात्रज बोगदामार्गे साताऱ्याकडे किंवा कात्रज चौक, नवले पुल डावीकडे वळून मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग

• राधा चौक डावीकडे वळून बाणेर रोडने विद्यापीठ चौक, उजवीकडे वळून संचेती चौक, उजवीकडे वळून खंडोजीबाबा चौक, टिळक रोडने जेधे चौक, पुणे सातारा रोडने कात्रज चौक, सरळ जुना कात्रज बोगदामार्गे साताऱ्याकडे किंवा कात्रज चौक, नवले पुल डावीकडे वळून मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग

साताऱ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या हलक्या व प्रवासी चारचाकी वाहनांकरीता-

• खेड शिवापूर टोलनाका, शिंदेवाडी, जुना कात्रज बोगदा, कात्रज चौक, पुणे सातारा रोडने जेधे चौक, डावीकडे वळून सारसबाग, पुरम चौक, डावीकडे वळून टिळक रोडने खंडोजीबाबा चौक, फर्ग्युसन रोडने वीर चाफेकर चौक, डावीकडे वळून विद्यापीठ चौक, राजीव गांधी पुलावरुन औंध वाकड रोडने वाकड चौक, डावीकडे वळून पुढे यु टर्न घेऊन मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग

• खेड शिवापूर टोलनाका, शिंदेवाडी, जुना कात्रज बोगदा, कात्रज चौक, डावीकडे वळून नवले पूल, वडगांव पूल अंडरपास, सिंहगड रोडने राजाराम पूल, डी.पी. रोडमार्गे नळस्टॉप, लॉ कॉलेज रोड, सेनापती बापट रोड, विद्यापीठ चौक, राजीव गांधी पुलावरुन औंध वाकड रोडने वाकड चौक, डावीकडे वळून पुढे यु टर्न घेऊन मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग

• खेड शिवापूर टोलनाका, शिंदेवाडी, जुना कात्रज बोगदा, कात्रज चौक, डावीकडे वळून नवले पूल, वडगांव पूल, वारजे पूल अंडरपास, आंबेडकर चौक, वनदेवी चौक, कर्वे पुतळा चौक, नळस्टॉप, लॉ कॉलेज रोड, सेनापती बापट रोड, विद्यापीठ चौक, राजीव गांधी पुलावरुन औंध वाकड रोडने वाकड चौक, डावीकडे वळून पुढे यु टर्न घेऊन मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग

Share This News

Related Post

मुलीचा लग्नासाठी नकार ! धमकीसाठी त्याने केला मुलीच्याच नावाचा वापर

Posted by - April 7, 2023 0
भोसरी विधानसभेचे भाजप आमदार महेश लांडगे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना धमकी…
Gondia

धक्कादायक ! झोपलेल्या मायलेकावर धारदार शस्त्राने वार; मुलाच्या डोळ्यादेखत आईचा मृत्यू

Posted by - June 8, 2023 0
गोंदिया : गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या श्रीनगर येथील चंद्रशेखर वार्डामध्ये काल बुधवारी पहाटे 3 वाजता अज्ञात व्यक्तीने आई आणि…
Report On Voter

Maharashtra Loksabha : राज्यात 5 वाजेपर्यंत सरासरी 52.49 टक्के मतदान

Posted by - May 13, 2024 0
पुणे : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील 11 मतदारसंघात आज सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सूरुवात झाली असून सायंकाळी 5 वाजेपर्यंत…
PM Kisan

PM Kisan : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! शेतकऱ्यांच्या खात्यावर ‘या’ दिवशी जमा होणार 14 वा हप्ता

Posted by - May 11, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पीएम किसान (PM Kissan) योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000…

मोठी बातमी! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात अविश्वास ठराव

Posted by - December 29, 2022 0
नागपूरमध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन शेवटच्या टप्प्यात आहे.अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच आता महाविकास आघाडीने राहुल नार्वेकरांविरोधात अविश्वास…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *