महत्वाची बातमी ! कोरोनामुळे आशियायी क्रीडा स्पर्धा स्थगित

488 0

बीजिंग- कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्यामुळे जगभरात भीती निर्माण झाली आहे. जगभरात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आशियायी क्रीडा स्पर्धा स्थगित करण्यात आल्याचे बोलले जात आहे. चिनी माध्यमांकडून ही माहिती प्रसारित करण्यात आली आहे.

आशिया ऑलिम्पिक कौन्सिलने शुक्रवारी सांगितले की, 10 ते 25 सप्टेंबर 2022 या कालावधीत चीनमधील हांगझोऊ येथे होणार्‍या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धा होणार होत्या. मात्र, आता या स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. चीनमध्ये कोविड-19 संबंधित प्रकरणे सातत्याने वाढत असल्याने ही घोषणा करण्यात आली आहे असे या अहवालात म्हटले आहे.

2022 आशियाई खेळ जे सप्टेंबरमध्ये हांगझोऊ येथे होणार होते ते आता पुढे ढकलण्यात आले आहेत. चीनच्या राज्य माध्यमांनी शुक्रवारी या संदर्भात माहिती दिली. आशियाई क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यामागे ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ आशियाने कोणतेही कारण दिलेले नाही, मात्र चीनमध्ये वाढत्या कोरोनाच्या प्रकरणांमुळे आशियाई क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्याचे मानले जात आहे.

Share This News

Related Post

Pune-PMC

पावसाळा पूर्व कामांसाठी पुणे महानगरपालिका अ‍ॅक्शन मोडवर

Posted by - June 15, 2023 0
पुणे : काही दिवसांत पावसाळा सुरु होईल. या पार्श्वभूमीवर पावसाळा पूर्व कामांसाठी पुणे महानगरपालिकेने कामाचा धडाका सुरु केला आहे. नाला…

54 वर्षीय प्राध्यापकाने मिठी मारून केला 27 वर्षीय प्राध्यापिकेचा विनयभंग

Posted by - April 5, 2022 0
पुणे – एका 54 वर्षीय प्राध्यापकाने एका 27 वर्षीय प्राध्यापिकेला मिठी मारून विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार…

पुणेकरांसाठी चांगली बातमी : भुयारी मेट्रोची ट्रायल रन यशस्वी; 85 टक्के काम पूर्ण !

Posted by - December 7, 2022 0
पुणे : सध्या कर्वे रोडवरील मेट्रो मार्ग सुरू आहे. अर्थात हा मार्ग सुरू असला तरी एकंदरीत अंतर पाहता वाहतुकीच्या दृष्टीने…
Crime News

Crime News : हिंदुस्तान जिंदाबादच्या घोषणा देणे पडले महागात; टोळक्याकडून तरुणाची निर्घृणपणे हत्या

Posted by - September 17, 2023 0
बॉलीवूड अभिनेता सनी देओलचा गदर-2 या चित्रपटला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. देशात अनेक राज्यात या चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल आहेत.…

दर्जेदार बियाणे, कृषी औजारे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवा – कृषीमंत्री अब्दुल सत्तार

Posted by - September 15, 2022 0
पुणे : शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याच्यादृष्टीने अत्याधुनिक तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, उत्कृष्ट पद्धतीची खते, दर्जेदार कृषी औजारे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचतील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *