अश्विनी जगताप यांनी चिंचवडचा गड राखला; 36 हजाराच्या मताधिक्याने विजय !

666 0

चिंचवड : कसबा पोटनिवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सर्वांचे लक्ष लागले होते ते चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या निकालाकडे… चिंचवड पोट निवडणुकीमध्ये 36 हजारांच्या मताधिक्याने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी गड राखला आहे.

अश्विनी जगताप यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी कटू आव्हान उभं केलं होतं. दरम्यान महाविकास आघाडीला निवडणुकीमध्ये कलाटेंच्या बंडखोरीचा चांगलाच फटका बसल्याचं स्पष्ट दिसून येते आहे.

चिंचवड पोटनिवडणुकीत तिरंगी लढत झाली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच अश्विनी जगताप यांनी आघाडी मिळवण्यास सुरुवात केली होती. तिरंगी लढतीचा फायदा अश्विनी जगताप यांना झाल्याचे दिसून आले. मतमोजणीच्या 37 व्या फेरीनंतर अश्विनी जगताप यांना 1 लाख 35 हजार 434 मते मिळाली. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांना 99 हजार 343 मते मिळाली. महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार, अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना 44 हजार 082 मते मिळाली.

Share This News

Related Post

…आणखी संपन्न, समृद्ध महाराष्ट्रासाठी एकजूट होऊया; मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा

Posted by - January 1, 2023 0
मुंबई: – नवीन वर्ष नव्या आशा-आकांक्षा घेऊन येते, नव संकल्पनांची प्रेरणा देते. येणारे 2023 हे नववर्ष आशा-आकांक्षा सत्यात आणणारे, नवसंकल्पना…

‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाच्या पुणे शहर प्रसिद्धीप्रमुखपदी संजय अगरवाल यांची नियुक्ती

Posted by - October 27, 2022 0
पुणे – सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार संजय अगरवाल यांची ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाच्या पुणे शहर प्रसिद्धीप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे…

तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी गरजेची – रामनाथ पोकळे

Posted by - October 14, 2022 0
पुणे : तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाच्या अतिवापरामुळे मौखिक कर्करोगाचे प्रमाण युवकांमध्ये वाढत असून त्यामुळे सामाजिक आणि कौटुंबिक व्यवस्थेवर विपरीत परिणाम…
missing girls

Missing Girls : धक्कादायक! राज्यात रोज सरासरी ‘इतक्या’ मुली होतायत गायब; आकडेवारी आली समोर

Posted by - May 8, 2023 0
पुणे : महाराष्ट्रातून मुलींच्या बाबतीत एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये राज्यात मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. एकट्या…

संदीप देशपांडे, संतोष धुरी यांच्या अटकपूर्व जामिनावर 19 मे रोजी निर्णय

Posted by - May 17, 2022 0
मुंबई- मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणी आज पूर्ण झाली आहे. 19 मे रोजी मुंबई…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *