HEALTH WEALTH : मुळव्याधीने त्रस्त आहात? ही पथ्य अवश्य पाळा; नक्की मिळेल आराम

368 0

मुळव्याध हा उष्णतेने होणारा आजार आहे. खरं तर हा सामान्य आजार आहे. परंतु काही जणांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो. अशा वेळी योग्य वैद्यकीय सल्लाच महत्वाचा आहे. यामध्ये देखील डॉक्टर तुम्हाला औषध उपचार वेळप्रसंगी सर्जरी देखील करण्यास सांगतात. परंतु त्यासह तुमच्या खानपानावर देखील नियंत्रण आणण्याचा सल्ला तुम्हाला दिला जातोच.

जर मूळव्याधीचा त्रास हा कधी कधी जाणवत असेल, जसे की काही जणांना शरीरामध्ये उष्णता वाढल्यानंतरच हा त्रास जाणवतो अशांसाठी हा उपाय खूप चांगला आहे.

जर तुम्हाला मूळव्याधीमध्ये रक्त पडणे, शौचास त्रास होणे, गुद्वारापाशी येणारा कोंब हे त्रास जाणवत असतील. तर सर्वात प्रथम मैद्याचे पदार्थ, बेकरी प्रॉडक्ट्स, फास्ट फूड, जंक फूड आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चहा-कॉफीवर नियंत्रण आणा. अवेळी होणारी चहा-कॉफी किंवा बद्धकोष्ठता वाढवू शकतील असे अन्नपदार्थ तुम्हाला अधिक त्रास देत असतात.

मसालेदार, तिखट, खारट पदार्थ यामुळे देखील त्रास वाढू शकतो. त्यामुळे शौचास आग होणे जळजळ होणे हे त्रास होतात. मांसाहारामध्ये चिकन आणि अंडी खाणे काही काळासाठी तरी थांबवा.

त्याचबरोबर आहारामध्ये जुने तांदूळ, ज्वारी, गहू, कुळीत, मुग, तूर ही कडधान्य त्याचबरोबर पडवळ, भेंडी, दुधी, तोंडली, वांगी, पालक, घोळ, शेपू, सुरण कंदमूळ या भाज्या अवश्य खा. त्याचबरोबर लिंबू, आवळा, अंजीर, केळी, पिकलेला पेरू, काळी द्राक्षे, डाळिंब ही फळे खा. त्यासह दूध, तूप, लोणी, ताक यांचा देखील आहारातमध्ये समावेश करा. त्यासह जमेल तितक्या वेळा बडीशेप किंवा जिरे घालून पाणी उकळावे आणि हे ग्लासभर पाणी तरी प्यावे.

See the source image

हे अन्नपदार्थ कोणते खावेत या सर्वांबरोबर योग्य वेळेमध्ये होणारे जेवण हा देखील सर्वच आजारांवर योग्य उपाय आहे. त्यामुळे जेवणाच्या वेळा अवश्य पाळा आणि पाणी योग्य वेळेमध्ये भरपूर प्या.

Share This News

Related Post

RAVI RANA : “बच्चू कडू दुखावले गेल्याने मी त्यांची माफी मागतो. पण त्यांचीही काही विधानं …!” VIDEO

Posted by - October 31, 2022 0
मुंबई : मागच्या काही दिवसांपासून आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात टोकाचा वाद सुरु होता. त्यावर आता पडदा पडला…

चांदणी चौक पाडण्याचेवेळी मुंबई-बंगळुरू महामार्गावरील पुणे शहरातील वाहतूक रहाणार बंद ; वाचा वाहतूक बदल आणि पर्यायी मार्ग

Posted by - September 28, 2022 0
पुणे : मुंबई- बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौकातील जुना पूल येत्या १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार आहे. हा…

मोठी बातमी! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज्यपाल कोश्यारींची भेट

Posted by - September 4, 2022 0
मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या भेटीसाठी राजभवनात दाखल झाले असून फडणवीस यांनी राजभवनातील गणपती बाप्पाचे दर्शन…

TOP NEWS SPECIAL REPORT : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजपची माघार फिक्स होती का ? फिक्स नव्हती तर काय होती रिस्क

Posted by - October 17, 2022 0
शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनानं रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यानंतरच भारतीय जनता पक्षानं ही निवडणूक…

‘साराभाई वर्सेस साराभाई’ फेम अभिनेत्री वैभवी उपाध्यायचा अपघाती मृत्यू

Posted by - May 24, 2023 0
‘साराभाई वर्सेस साराभाई 2’ (Sarabhai vs Sarabhai) या शोमध्ये जॅस्मीन ही भूमिका साकारणारी अभिनेत्री वैभवी उपाध्याय (Vaibhavi Upadhyaya) हिचा एका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *