Documents

Caste Certificate : 45 दिवसांत मिळेल जात प्रमाणपत्र; ‘या’ कागदपत्रांसह करा अर्ज

1648 0

सोलापूर : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजताना दिसत आहे. 1967 पूर्वीच्या कुणबी नोंदी (Caste Certificate) तपासणीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. संपूर्ण राज्यात या नोंदी शोधण्याचं काम सुरु आहे. वंशावळ जुळलेल्या अर्जदाराने कागदपत्रांसह तहसीलदारांकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर केल्यानंतर संबंधिताला 45 दिवसांत जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाहीदेखील प्रशासनाकडून सुरु करण्यात आली आहे. राज्यात सर्वाधिक कुणबी नोंदी नगर, धुळे, पुणे, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर, जालना या जिल्ह्यांमध्ये आढळल्या आहेत.

3 डिसेंबर रोजी सर्वच जिल्ह्यातील नोंदीचा अहवाल राज्य सरकारला पाठविला जाणार आहे. मनोज जरांगे- पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील निर्णय घेण्यासाठी सरकारला 24 डिसेंबरपर्यंत वेळ दिला आहे. या पार्श्वभूमीवर दिवाळी सुट्ट्यांमध्ये देखील शिक्षक, मुख्याध्यापकांसह बहुतेक शासकीय विभागांमधील राज्यात 45 हजारांवर कर्मचारी नोंदी तपासत असल्याची स्थिती आहे. त्यात 1948 ते 1967 आणि 1948 पूर्वीच्या नोंदींची पडताळणी केली जात आहे. दरम्यान, वंशावळ जुळवून उर्वरित कागदपत्रे असल्याशिवाय जात प्रमाणपत्र दिले जात नाही. परिपूर्ण प्रस्ताव दाखल केलेल्यांना एका महिन्यातच जात प्रमाणपत्रे दिली जात आहेत.

अर्जासोबत जोडावी लागणार ‘ही’ कागदपत्रे
वंशावळ (वडिल, आजोबा, पणजोबा) काढून त्याची पुराव्यानिशी जुळवावी लागणार
अर्जदाराचा रहिवासी दाखला
शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड
अर्जदाराचे आधारकार्ड, रेशनकार्ड
जन्म- मृत्यू नोंदीचा 1967 पूर्वीचा पुरावा
कुटुंबातील व्यक्तीचे जात किंवा जात वैधता प्रमाणपत्र (बंधनकारक नाही)

अर्ज कुठे करावा?
सेतू बंद असल्याने महा-ई-सेवा केंद्रातून तहसीलदारांकडे जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा
अर्ज केल्यानंतर 45 दिवसांत दाखला देणे प्रशासनाला बंधनकारक असणार आहे.
अर्ज करताना जात प्रमाणपत्रासाठी 53 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
अर्जातील त्रुटींची माहिती अर्जदाराला मोबाईलवर समजणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Chhagan Bhujbal : छगन भुजबळांना मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून… मनोज जरांगेचा मोठा आरोप

Nashik News : गॅस भरताना ओमनी कारचा अचानक झाला स्फोट; चिमुकल्यांसह 10 जण जखमी

Yavatmal News : धक्कादायक ! विजेचा शॉक लागून विद्यूत कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

Share This News

Related Post

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदी समीर थिगळे फेरनिवड

Posted by - April 20, 2022 0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी समीर थिगळे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. मुंबई येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते…

PUNE : अन्यथा पाण्यासाठी आंदोलन करणार ! – भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने

Posted by - November 25, 2022 0
पुणे : औंध, बोपोडी भागातील काही सोसायट्यांमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. पुणे महानगरपालिकेमार्फत त्यांच्यासाठी पिण्याचे पाण्याचे टँकर सुरु…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आनंद नगर झोपडपट्टीतील रहिवाशांच्या न्याय हक्कासाठी गंगाधाम चौकात एक दिवसीय धरणे आंदोलन

Posted by - September 29, 2022 0
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे आनंद नगर झोपडपट्टीतील रहिवाशांच्या न्याय हक्कासाठी गंगाधाम चौक येथे संजय दामोदरे यांच्या नेतृत्वाखाली एक…

मोठी बातमी : चिंचवड मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने निधन

Posted by - January 3, 2023 0
पिंपरी : आमदार लक्ष्मण जगताप यांचे मंगळवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. भारतीय जनता पक्षाचे चिंचवड मतदार संघाचे आमदार…

पुणे बंद ! राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांची तातडीने हकालपट्टी करावी या मागणीसाठी मंगळवारी पुणे बंद आणि मुकमोर्चा

Posted by - December 12, 2022 0
पुणे : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक शब्द वापरून शिवाजी महाराजांची अवहेलना केल्याच्या निषेधार्थ सर्वधर्मीय…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *