मालमत्तेची वाटणी करताय ? हि माहिती तुम्हाला असायलाच हवी ! वाचा सविस्तर माहिती

879 0

मालमत्तेचे अनेक वारसदार असतील तर वाटणी अधिक किचकट आणि ताण देणारी प्रक्रिया ठरू शकते. मालमत्तेच्या बाबतीत जेवढी स्पष्टता असेल, तेवढे वाटणीची प्रक्रिया सुलभ आणि सामजस्यांने मार्गी लागते. अलिकडे विभक्त कुटुंबाची संख्या वाढू लागल्याने एकत्र कुटुंबाची मालमत्ता विभागली गेली आहे. गावकडची जमीन असो, वाडा असो किंवा बंगला असो, कोणत्या ना कोणत्या कारणावरून मालमत्तेची वाटणी करावी लागते. यासंबंधी माहिती जाणून घेऊ या.
वाटणीचा अर्थ

कोणत्याही मालमत्तेची वाटणी ही मालकाच्या निर्णयावर अवलंबून असते. वाटणीच्या माध्यमातून मालमत्तेवरचा संपूर्ण अधिकार हा व्यक्तिगत अधिकाराच्या रुपात बदलतो. वाटणीची प्रक्रिया ही मालमत्तेला भेट स्वरुपात देणे किंवा हस्तांतरण प्रक्रियेपेक्षा वेगळी आहे. एकत्र कुटुंब पद्धतीत प्रत्येक सदस्याला जन्मापासून मालमत्तेत वाटा मिळतो. अशा मालमत्तेला दोन किंवा त्यापेक्षा अधिक भागात विभागले जाते. प्रत्येक भागाला व्यक्तिगत मालमत्तेच्या रुपातून संबंधित व्यक्तीच्या नावाने ट्रान्सफर केले जाते. म्हणजेच एका संयुक्त मालमत्तेतून दोन किंवा अनेक वैयक्तिक मालमत्ता तयार होतात. वाटणीनुसार ठरवून दिलेल्या मालमत्तेवर सदस्याचा हक्क प्रस्थापित होतो.

पार्टीशन डीड

एकत्र मालमत्तेच्या वाटणीसाठी पार्टीशन डीड तयार करावी लागते. या डीडला रजिस्टर्ड करणे गरजेचे असते. यासाठी स्टँप ड्यूटी आणि शुल्क देखील भरावे लागते. वाटणीच्या वेळी सर्व भागीदारांची सहमती असणे अत्यंत आवश्यक असते आणि आपल्या हिश्श्याशिवाय उर्वरित हिश्श्यावरचा हक्क सोडावा लागतो. याप्रमाणे भागीदारांचे सह-स्वामित्व असणारे स्टेटसचे अस्तित्व देखील संपते आणि ते सर्व व्यक्तिगत मालक होतात. अर्थात प्रत्येक भागिदार हा कुटुंबाला मिळालेल्या मालमत्तेत सहभागी राहिल आणि तो हिंदू एकत्र कुटुंबाचे अस्तित्व देखील टिकवू शकतो. वाटणीच्या अगोदर कौटुंबीक स्थितीचे आकलन करणे गरजेचे आहे. यात घरावरचे कर्ज, कुटुंबावर अवलंबून असलेल्या महिला, मुलींचा विवाह आदी जबाबदारीचे आकलन करावे लागते.

वाटाघाटी शक्य

वाटणीची प्रक्रिया वाटाघाटीतूनही होऊ शकते. एकाच मालमत्तेच्या वेगवेगळ्या हिश्श्यावर स्वतंत्र रुपाने मालक म्हणून त्याचा वापर करताना दुसर्‍याच्या हिश्श्यात ढवळाढवळ होणार नाही, याची खबरदारी घेतली जाते. एवढेच नाही तर एखाद्या भागाची वाटणी केली जाईल आणि उर्वरित मालमत्तेवर संयुक्तरित्या हक्क देखील कायम ठेवता येतो.

वाटणी न होणारी मालमत्ता

मालमत्तेचे असे काही स्वरुप असते की, त्याची वाटणी होऊ शकत नाही किंवा अन्य कारणाने त्याची वाटणी करणे शक्य नसते. अशावेळी त्याची किंमत देऊन त्याची वाटणी केली जाते.

Share This News

Related Post

सीईटीच्या ऑनलाईन परीक्षेची तारीख पुढे ढकलली, या तारखेपर्यंत करता येणार नावनोंदणी

Posted by - May 6, 2022 0
मुंबई- सीईटीच्या ऑनलाईन परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आली असून आता विद्यार्थ्यांना ११ मे च्या मध्यरात्रीपर्यंत रजिस्ट्रेशन करता येणार आहे. एमएचटी…

BJP Leader Udayanraje Bhosale : ” शिवाजी महाराजांच्या नावाने पक्ष स्थापन केला , मग मी म्हणू का पक्ष माझा आहे …! “

Posted by - August 12, 2022 0
पुणे : भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी पुण्यामध्ये दीपक केसरकर यांची भेट घेतली . या भेटीमध्ये महाबळेश्वरचा पर्यटन विकास या…

भारत जोडो यात्रेसाठी पुण्यात काँग्रेसकडून फ्लेक्सबाजी

Posted by - November 12, 2022 0
सध्या संपूर्ण भारतामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सुरु असलेल्या भारत जोडो यात्रेची चर्चा सुरू आहे आणि हीच भारत जोडो…

पुणे : येरवडा वाहतूक विभागाअंतर्गत पार्किंगमध्ये करण्यात आला ‘हा’ बदल ; वाचा सविस्तर

Posted by - September 13, 2022 0
पुणे : येरवडा वाहतुक विभागाअंतर्गत कल्याणी व्हेज हॉटेल ते लेक्सीकन शाळा आणि एमएसईबी ऑफीस ते सायबेज कंपनी कॉर्नर, मारिगोल्ड सोसायटी…

पंढरपुरात माघी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मनमोहक फुलांची आरास (व्हिडिओ)

Posted by - February 12, 2022 0
पंढरपूर- आज माघ शुद्ध अर्थात जया एकादशी. या निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मनमोहक फुलांची आरास करण्यात आली असून पंढरपुरात जवळपास…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *