लहान मुलं अभ्यास करायला त्रास देत आहेत? हे उपाय अवलंबून पहा, नक्की चांगला परिणाम दिसेन…

543 0

आज-काल खरंतर शिक्षण पद्धतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर बदल झाले आहेत. कमीत कमी वयामध्ये अधिकाधिक विषयांचे पुरेपूर ज्ञान देण्याच्या स्पर्धेमध्ये मुलांचं बालपण पूर्णपणे हरवून गेल आहे. हा मुद्दा खरं तर वेगळा आहे, परंतु अनेक मुलं याच अभ्यासाच्या दडपणामुळे देखील अभ्यास करण्याचाच कंटाळ करतात. मग त्यावर अनेक वेळा वेगवेगळे तोडके आपण शोधून काढतो. मग गाण्याच्या चाली लावून पाढे पाठ करून घेणे, किंवा मोबाईलवर व्हिडिओ स्वरूपात एखादा अभ्यासक्रम पूर्ण करून घेणे. पण खरंच यामुळे मुलांना अभ्यासाची गोडी लागते आहे का ? हा फार मोठा प्रश्न आहे.

यावर सविस्तर आपण नंतर पाहूया, पण आज मी तुम्हाला असे काही किरकोळ उपाय सांगणार आहे, ज्यामुळे कदाचित मुलांच्या अभ्यासातली गोडी फारशी वाढणार नाही पण अभ्यासाचा कंटाळा तरी ते करणार नाहीत.

१. शाळेतून आल्यानंतर मुलांशी इतर विषयांवर चर्चा करा. घरचा अभ्यास काय दिला आहे ? शाळेतला दिवस कसा होता ? यापेक्षा आज त्यांच्यासाठी काय विशेष खाऊ केला आहे , या विषयी त्यांच्याशी गप्पा मारा… मनमोकळ बोला ,त्यांना टेन्शन फ्री करण्याचा प्रयत्न करा.

See the source image

२. मुलांच्या अभ्यासाच्या वेळेमध्ये तुम्ही स्वतः टीव्ही लावून किंवा मोबाईल घेऊन बसू नका. मुलांना भलेही एकच तास अभ्यास करू द्या, पण त्या वेळेमध्ये एकतर मुलांच्या अभ्यासामध्ये तुम्ही स्वतः इन्व्हॉल व्हा, किंवा तुम्ही देखील त्यांच्यासोबत एखादं पुस्तक घेऊन वाचत बसा.

See the source image

३. मुलांना खेळायला बाहेर जाऊ द्या. शाळेतून आल्यानंतर लगेचच अभ्यासाला बसवणं खूप चुकीचं होईल. त्यांना मित्र-मैत्रिणींशी बोलू द्या. खेळू द्या ,मोबाईल किंवा टीव्ही पेक्षा त्यांना मैदानी खेळांमध्ये रमू द्या. आजकालच्या फ्लॅट संस्कृतीमध्ये मुलांशी खेळायला फारसं कोणी नसेल तर तुम्ही स्वतः वेळ काढा. आणि त्यांच्यासोबत अर्धा तास का होईना बाहेरच्या वातावरणामध्ये मोकळ फिरून या.

See the source image

४. त्यांना कोणतही आमिष देऊन बळबळ अभ्यास पूर्ण करून घेऊ नका. एखाद्या दिवशी अभ्यास नाही केला तरी आयुष्यात कधीच पुढे त्यांना जॉब मिळणार नाही, असं होणार नाहीये. हे आधी तुम्ही समजावून घ्या. इतर मुलांची स्पर्धा करण्यापेक्षा तुमच्या मुलाला स्वतःसोबत स्पर्धा करायला शिकवा.

५. बाहेरच्या मुलांची किंवा घरात अगदी बहीण भावंडांची देखील बुद्धिमत्तेची बरोबरी करू नका.

See the source image

६. आणि शेवटचं म्हणजे मुलांची अभ्यासाची जागा नेहमी स्वच्छ आणि सुगंधित ठेवण्याचा प्रयत्न कराच. एक सरस्वती देवीची सुंदर मूर्ती आणि श्री गणेशाची मूर्ती अवश्य त्यांच्या टेबलवर ठेवा. मुलं अभ्यासाला बसताना त्यांचे तोंड उत्तर दिशेला होईल अशी त्यांची बैठक मांडा. अवश्य परिणाम जाणवेल.

Share This News

Related Post

उद्यापासून सर्वसामान्यांसाठी खुली होणार प्राणी संग्रहालयांची दारं

Posted by - March 19, 2022 0
कोरोनामुळे बंद असलेले महापालिकेचे कात्रज येथील स्वर्गीय राजीव गांधी प्राणी संग्रहालय व वन्य संशोधक केंद्र रविवारपासून पुणेकरांसाठी पुन्हा खुले होणार…

PMPML बसची दुचाकी स्वारासह अनेक वाहनांना धडक; अपघाताची भीषणता दाखवणारा व्हिडिओ समोर

Posted by - December 29, 2022 0
पुणे : पुण्यामध्ये बुधवारी रात्री एक भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, या पीएमपीएमएल बसने एका दुचाकी…
Ganesh Chaturthi 2023

Ganesh Chaturthi 2023: यंदाची गणेश चतुर्थी असणार खास ! तब्बल 300 वर्षांनंतर जुळून येणार ‘हा’ अद्भुत योग

Posted by - September 18, 2023 0
पौराणिक मान्यतेनुसार, भगवान गणेशाला आद्य देवता मानले जाते. कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी गणेशाची पूजा (Ganesh Chaturthi 2023) केली जाते.…

पुणे : जिल्ह्यात ५० हजार रुपयांचा प्रतिबंधित पदार्थाचा साठा जप्त

Posted by - November 10, 2022 0
पुणे : अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने पुणे जिल्ह्यात सुमारे ५० हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधित पदार्थाचा साठा जप्त करण्याची कारवाई…

पुणेकरांनो ! ‘थर्टी फर्स्ट’ च्या रात्री पुण्यात 3 हजार पोलिसांचा बंदोबस्त ; हुल्लडबाजांनी सावध राहा

Posted by - December 30, 2022 0
पुणे : कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर दोन वर्षांनी यंदा नववर्षाचे स्वागत उत्साहात करता येणार आहे. कायदा व सुव्यवस्थेसाठी गर्दीच्या ठिकाणी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *