ग्रामपंचायत निवडणूकीचा खर्च सादर करण्याचे आवाहन; खर्चाचा हिशोब सादर न करणाऱ्या उमेदवारांवर अपात्रेची कारवाई सुरू

715 0

पुणे : जिल्ह्यात १८ डिसेंबर रोजी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये खर्चाचा हिशोब सादर न करणाऱ्या उमेदवारांवर अपात्रेची कारवाई सुरू करण्यात येणार असून २० जानेवारी २०२३ पर्यंत निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यामध्ये १८ डिसेंबर २०२२ रोजी २२१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका पार पडल्या. या निवडणूकीचा निकाल २३ डिसेंबर २०२२ रोजी जाहीर करण्यात आला आहे. या निवडणूकीमध्ये सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या २ हजार ७४ जागांसाठी ३ हजार ५३२ उमेदवारांनी निवडणूक लढविली आहे. तसेच ७६१ उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत.

निवडणूक लढविणाऱ्या व बिनविरोध निवडून आलेल्या एकूण ४ हजार २९३ उमेदवारांनी त्यांचा निवडणूकीच्या खर्चाचा हिशेब २० जानेवारी २०२३ पर्यंत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी अथवा तहसिल कार्यालयात प्रतिज्ञापत्रासह जमा करणे आवश्यक आहे. खर्चाचा हिशोब प्रतिज्ञापत्रासह सादर न करणाऱ्या उमेदवारांना अपात्र करण्याबाबतची कार्यवाही जिल्हा प्रशासनामार्फत तातडीने सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी त्यांच्या निवडणूकीच्या खर्चाचा हिशेब तातडीने सादर करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी केले आहे.

Share This News

Related Post

ॲड.गुणरत्न सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Posted by - April 13, 2022 0
मुंबई- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना चिथावणी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंद असलेल्या ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना आज न्यायालयीन…

गणेशोत्सव, दहीहंडी उत्साहात आणि शांततेत साजरा करा ; गणेशोत्सव मंडळाना नोंदणी शुल्क, हमी पत्राची अट शिथिल

Posted by - July 21, 2022 0
मुंबई : गणेशोत्सव, दहीहंडी आणि मोहरम तसेच अन्य आगामी सण उत्सव शांततेत उत्साहात आणि जल्लोषात पार पडावा यासाठी सर्वं यंत्रणांनी…

धार्मिक भावना आपल्या घरात ठेवाव्यात; हनुमान चालिसेवरून रंगलेल्या राजकारणावर शरद पवारांची प्रतिक्रिया

Posted by - April 25, 2022 0
राज्यात सध्या हनुमान चालिसावरुन राजकारणात कलगीतुरा रंगू लागला आहे. राणा दांपत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा…

पुणे, पिंपरी-चिंचवड सहित ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित, सकाळी ११ वाजेपर्यंत सुरु होण्याची शक्यता

Posted by - February 9, 2022 0
पुणे- महापारेषणच्या लोणीकंद व चाकण या दोन्ही महत्वाच्या ४०० केव्ही अतिउच्च दाबाच्या उपकेंद्रांना वीजपुरवठा करणाऱ्या टॉवर लाईनमध्ये आज, बुधवारी पहाटे…

ऋण वसुली न्यायाधिकरण आयोजित लोकन्यायालयामध्ये ६०४ कोटी रुपयांची वसुली

Posted by - December 26, 2022 0
पुणे : ऋण वसुली न्यायाधिकरण पुणे यांच्यावतीने आयोजित लोकन्यायालयामध्ये २३० खटल्यांच्या तडजोडीतून ६०४ कोटी रुपयांची वसुली करण्यात आल्याची माहिती न्यायाधिकरणाचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *