बाजार समितीत महाविकास आघाडीचा गुलाल ! कुणाला किती जागा मिळाल्या ?

1601 0

राज्यातील 147 कृषी उत्पन्न बाजार समित्याच्या जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत आतापर्यंत 72 जागांचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये महाविकास आघाडीला सर्वाधिक 41 जागा मिळाल्या आहेत. तर भाजप-शिवसेना युतीला अत्यंत कमी 24 जागा मिळाल्या आहेत. मालेगाव बाजार समितीत मंत्री दादा भुसे गटाचा पराभव झाला तर भुसावळ बाजार समितीत एकनाथ खडसेंना मोठा धक्का बसला आहे.

147 जागांपैकी 72 जागांचा निकाल जाहीर झाला आहे. त्यात महाविकास आघाडीला सर्वाधिक 41 जागा मिळाल्या आहेत. तर भाजप आणि शिंदे गटाला फक्त 24 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे युतीसाठी हा मोठा धक्का असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे राज्यातील जनतेचा कौल कुणाच्या दिशेने आहे हे स्पष्ट होत आहे.

महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी भाजप हा सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरला आहे. भाजपला आतापर्यंत 20 जागा मिळाल्या आहेत. तर शिंदे गटाला अवघ्या चार जागांवर समाधान मानावे लागले आहे. राष्ट्रवादीला 17, काँग्रेसला 18 आणि ठाकरे गटाला अवघ्या सहा जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत इतरांना सात जागा मिळाल्या आहेत.

भुसावळ बाजार समितीत भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या शेतकरी विकास पॅनलने १८ पैकी १५ जागांवर विजय मिळवत बाजार समितीवर एक हाती सत्ता मिळवली. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या शेतकरी सहकार पॅनलला केवळ तीन जागांवर यश मिळालं आहे. हा निकाल महाविकास आघाडीचे नेते एकनाथ खडसे व माजी आमदार संतोष चौधरी यांना मोठा धक्का मानला जात आहे.

या निवडणुकीचे निकाल लागताच विजयी उमदेवाराच्या समर्थकांनी गुलाल उधळत आणि एकमेकांना पेढे भरवत एकच जल्लोष केला. यावेळी ढोल ताशांच्या तालावंर कार्यकर्त्यांनी ठेका धरला होता.

Share This News

Related Post

काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी अरविंद शिंदे यांची निवड

Posted by - June 7, 2022 0
काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी ज्येष्ठ नेते, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि माजी गटनेता अरविंद शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. शिंदे यांची…
Nashik News

Nashik News : पती, पत्नी और वो ! ‘त्या’ त्रासाला कंटाळून महिलेने घेतलेल्या निर्णयाने अख्खं नाशिक हादरलं

Posted by - September 15, 2023 0
नाशिक : नाशिकमध्ये (Nashik News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पतीचे अनैतिक संबंध असल्याने आणि पतीकडून होत असलेल्या जाचास…

पुण्यात आज संध्याकाळी अग्निशमन दलाकडे आगीच्या 3 घटना

Posted by - October 28, 2022 0
पुणे – दिनांक २८•१०•२०२२ रोजी सायंकाळी सहानंतर आगीच्या ०३ घटना घडल्या असून सदर ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान वेळेत पोहोचल्याने धोका…
Top News Marathi Logo

नक्की कोण कुणाचं ? शिंदे गटाच्या विरुद्ध फायली पुरवणारे भाजपचेचं लोक ? संजय राऊत यांचा गौप्यस्फोट ! वाचा काय म्हणाले संजय राऊत

Posted by - December 28, 2022 0
नागपूर : सध्याचं राजकारण हे खऱ्या अर्थाने नकारात्मक राजकारणाचा काळा चेहरा समोर आणणार ठरतं आहे. रोजच प्रत्येक पक्षाच्या नेत्यावर वेगवेगळे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *