उपोषण करून सरकारला जाब विचारणाऱ्या अण्णांच्या विरोधात आता आंदोलन !

465 0

राळेगणसिद्धी- आंदोलन, उपोषणा करून सरकारला जाब विचारणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे मागील काही दिवसांपासून शांत बसलेले पाहायला मिळत आहेत. देशात महागाईचा आगडोंब उसळला असताना अण्णा शांत कसे हा प्रश्न करत सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ काशिद यांनी झोपी गेलेल्या अण्णा हजारे यांना उठवण्यासाठी 1 जून रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

सोमनाथ काशीद यांनी म्हटले आहे की केंद्र सरकारने निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्वासने पाळली नाहीत. महागाईतही प्रचंड वाढ झाली आहे. घरगुती वापराच्या एलपीजी गॅसची दरवाढ, इंधनासह खाद्यतेलाची होत असलेली दरवाढ, त्यातच खाद्यान्नांची होत असलेली दरवाढ यामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. महागाई विरोधात सर्वसामान्यांमध्ये मोठा आक्रोश असून सरकारविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. जनता महागाईत होरपळत असताना अण्णा हजारे शांत कसे काय आहेत ? असा सवाल काशीद यांनी केला आहे.

अण्णा हजारे हे झोपले असतील तर त्यांना झोपेतून उठवण्याची आवश्यकता आहे. सामान्यांना मोठा त्रास होत असूनही अण्णा हजारे यांनी एक शब्दही सरकारविरोधात काढला नाही. अण्णा हजारे हे झोपले असतील तर त्यांना झोपेतून उठवण्याची आवश्यकता आहे. अण्णा हजारेंनी जनतेसाठी महागाईविरोधात जनआंदोलन सुरू करण्याची गरज असल्याचे सोमनाथ काशिद यांनी म्हटले आहे.

दुसरीकडे वाढत्या वयोमानानुसार, प्रकृतीच्या कारणांमुळे अण्णा हजारे आंदोलन करू शकत नसल्याचे त्यांच्या समर्थकांनी सांगितले. युपीए-2 च्या कार्यकाळात भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून अण्णा हजारे आणि इतरांनी मोठे आंदोलन उभारले होते. लोकायुक्ताच्या मुद्यावर राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एकतर कायदा करा अन्यथा सरकारमधून पायउतार व्हा असा इशारा अण्णा हजारे यांनी दिला आहे. लोकायुक्त कायदा बनविण्याचं लेखी आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होतं. मात्र, अडीच वर्षे उलटून देखील त्यावर काहीच झाले नसल्याची खंत अण्णा हजारे यांनी व्यक्त केली.

Share This News

Related Post

Sharad Mohol Murder

Sharad Mohol : मोहोळचा गेम झालाय, मास्टरमाईंडला सांगा; हत्येनंतर आरोपींनी ‘या’ सरकारी कर्मचाऱ्याला केला कॉल

Posted by - January 14, 2024 0
पुणे : शरद मोहोळ हत्या प्रकरणी (Sharad Mohol) पोलिसांनी आतापर्यंत एकूण 13 जणांना अटक करण्यात आली आहे. हल्ला करणाऱ्यांसह पिस्तुल…

छगन भुजबळ म्हणतात; “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेटच देत नाहीत…!” वाचा सविस्तर

Posted by - November 16, 2022 0
शिंदे गटाचे आमदार, उद्धव ठाकरे भेटत नाही म्हणून आरोप करत होते, पण मलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

#BHOLA : भोला ट्रेलरमुळे लोकांमध्ये उत्साह, प्रदर्शनापूर्वीच म्हणतायत पठाणपेक्षा चांगला चित्रपट असणार …पहा ट्रेलर

Posted by - March 6, 2023 0
अजय देवगणच्या बहुप्रतिक्षित ‘भोला’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. टीझरप्रमाणेच चित्रपटाच्या ट्रेलरनेही प्रेक्षकांना भुरळ घातली. भोलाचे अॅक्शन सीन्स,…

दहशतवादी हल्ल्याने इसराइल हादरलं! 100 हून अधिक नागरिकांनी जीव गमावल्याची भीती

Posted by - October 7, 2023 0
इस्त्रायलच्या तीन शहरांवर गाझा पट्टीतून हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्याची जबाबदारी पॅलेस्टानी संघटना हमासने स्वीकारली आहे. इस्रायलसह अश्कलोन आणि…
Bhagirath Bhalke

Bhagirath Bhalke : राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके BRS पक्षात करणार प्रवेश?

Posted by - June 25, 2023 0
पंढरपूर : मंगळवेढा मतदार संघातील राष्ट्रवादीचे नेते, दिवंगत माजी आमदार भारत भालके (Bhagirath Bhalke) यांचे सुपुत्र भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) …

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *