अनिल परब ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल

208 0

मुंबई- शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह २५ आमदार नॉट रिचेबल झाल्यानंतर शिवसेनेच्या गोटामध्ये भूकंप झाला आहे. त्यातच परिवहन मंत्री अनिल परब हे दापोली रिसाॅर्ट प्रकरणी ईडी कार्यालयात पोहोचले आहेत. काल ईडीकडून त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते.

अनिल परब हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे महत्त्वाचे नेते समजले जातात. काही दिवसांपूर्वी ईडीने अनिल परब यांच्या खासगी आणि शासकीय निवासस्थानावर छापा मारला होता. त्याशिवाय अंधेरीतील शिवसेना पदाधिकाऱ्याच्या घरीदेखील छापा मारला होता. त्यावेळी अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीचे अधिकारी जवळपास 12 तास ठाण मांडून होते.

अनिल परब दापोलीमधील रिसाॅर्ट प्रकरणात झालेल्या कथित मनी लाॅन्ड्रिंग प्रकरणात ईडीच्या रडारवर आहेत. दापोलीतील कथित बेकायदेशीर रिसॉर्ट प्रकरणी ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. ईडीने अनिल परब यांना मागील आठवड्यात चौकशीसाठी समन्स पाठवले होते. त्यावेळी अनिल परब यांनी मंत्री असल्याने पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने चौकशीसाठी अनुपस्थित राहणार असल्याचे सांगितले होते.

Share This News

Related Post

आरती सुरु असताना 100 वर्ष जुने कडुलिंबाचं झाड कोसळले, ७ जण दगावले

Posted by - April 10, 2023 0
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातुन एक धक्कादायक घटना घडली आहे. पारस येथील बाबूजी महाराज मंदिरात आरती सुरू असतानाच 100 वर्ष जुनं…
Maharashtra Politics

Maharashtra Politics : महाराष्ट्रात नितीश कुमारांना मोठा झटका ! ‘या’ नेत्याने दिली पक्षाला सोडचिट्टी

Posted by - March 3, 2024 0
मुंबई : शिक्षक आमदार आणि जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय महासचिव कपिल पाटील आज जनता दल युनायटेडला (Maharashtra Politics) सोडचिट्टी देणार…

विधानसभेत अजित पवारांनी भाजप आणि शिंदे गटाचा घेतला समाचार

Posted by - July 3, 2022 0
महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांनी निवड झाली आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या 164 आमदारांनी राहुल नार्वेकर यांना मतदान केलं.…

आली दिवाळी…! उद्या आहे ‘वसुबारस’ ; वाचा महत्व, मान्यता, पूजा विधी, नंदिनी व्रत …

Posted by - October 20, 2022 0
गोवत्स द्वादशी हा एक हिंदू सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सव आहे. जो दिवाळी उत्सवाची सुरुवात करतो, विशेषत: भारतीय महाराष्ट्र राज्यात, जिथे…

किरीट सोमय्यांपाठोपाठ नील सोमय्यांचा अटकपूर्व जामीन देखील फेटाळला

Posted by - April 12, 2022 0
मुंबई- सेव्ह विक्रांत कथित घोटाळाप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता त्यांचे पुत्र नील सोमय्यांचा देखील अटकपूर्व…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *