महत्वाची बातमी ! नवाब मलिक आणि अनिल देशमुखांचा अर्ज फेटाळला ! राज्यसभेसाठी मतदान करता येणार नाही

322 0

मुंबई- राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला आज मोठा झटका बसला. सध्या तुरुंगात असलेले अनिल देशमुख व नवाब मलिक या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांचा मतदानाचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला.

राज्यसभा निवडणुकीत मतदानासाठी एका दिवसाचा तात्पुरता जामीन मिळावा, असा अर्ज दोघांनी विशेष पीएमएलए न्यायालयाकडे केला होता. “आम्ही विधानसभा कामकाजात भाग घेण्यासाठी परवानगी मागत नसून केवळ मत टाकण्यासाठी काही तासांकरिता न्यायालयीन कोठडीतून विधानभवनात पोलिस सुरक्षेत पाठवण्याची परवानगी मागत आहोत. आमचा मूलभूत हक्क असल्याचा दावा करून नव्हे, तर मतदारसंघाबाबत असलेले कर्तव्य बजावता यावे या हेतूने कोर्टाच्या विशेषाधिकारात परवानगी मागत आहोत”, असा युक्तिवाद देशमुख आणि मलिक यांच्या वतीने कोर्टात करण्यात आला होता.

या अर्जाला ईडीने विरोध करत 1951 कलम 62(5) या कायद्याचा हवाला दिला. कायद्यानुसार, एखादा व्यक्ती तुरुंगामध्ये असेल तर त्या व्यक्तीला कोणत्याही निवडणुकीत मतदान करता येणार नाही, असे ईडीने न्यायालयाला सांगितले. या कायद्यान्वये कैद्यांना मतदान करण्याचा अधिकार नसल्याची भूमिका ईडीने विशेष न्यायालयापुढे मांडली. आता या निर्णयाच्या विरोधात नवाब मलिक आणि अनिल देशमुख मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अपील करणार आहेत.

अनिल देशमुख यांच्यावर मनी लाँड्रिंगप्रकरणी गुन्हा दाखल असून, ते गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरपासून तुरुंगात होते. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. नवाब मलिकदेखील अंडरवर्ल्डशी संबंधित आरोपांमुळे कोठडीत आहेत.

Share This News

Related Post

मुंबईत काँग्रेस-भाजपमध्ये संघर्ष, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Posted by - February 14, 2022 0
मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील काँग्रेसमुळे कोरोना पसरल्याचं विधान संसदेत केलं होतं. या विधानाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने राज्यभरात भाजपच्या…
Ajit Pawar

Ajit Pawar : आरक्षणाबाबत उद्या सर्वपक्षीय बैठक बोलवणार; अजित पवारांचे मोठे भाष्य

Posted by - September 10, 2023 0
पुणे : राज्यामध्ये मराठा समाजाचे आरक्षणासाठी तीव्र आंदोलन सुरू आहे. जालन्यात उपोषणकर्ते मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहे. याबाबत…

दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात ‘मोगरा महोत्सव’

Posted by - April 20, 2022 0
मोग-यासह गुलाब, चाफा, झेंडू, लिलीसारख्या फुलांनी सजलेला सभामंडप आणि गाभारा तसेच मुकुट, शुंडाभूषण, कान व पुष्पपोशाखाने सजलेले गणरायाचे मनोहारी रुप…

ई-मान्यता प्रणाली राज्यासाठी मार्गदर्शक ठरेल-शिक्षणमंत्री दिपक केसरकर

Posted by - April 2, 2023 0
पुणे जिल्हा परिषदेने सुरू केलेली ई-मान्यता प्रणाली राज्यस्तरावरील एकात्मिक शाळा व्यवस्थापन प्रणाली सुरू करण्यासाठी मार्गदर्शक ठरेल. अशी प्रणाली विकसीत करताना…
Hingoli News

Hingoli News : राजू शेतात जाऊन येतो; म्हणत घरातून गेला मात्र माघारी परतलाच नाही

Posted by - November 27, 2023 0
हिंगोली : हिंगोलीमधून (Hingoli News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील गोजेगाव या ठिकाणी शेतात थांबल्याने युवकावर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *