माजी गृहमंत्री अनिल देशमुख सीबीआयच्या ताब्यात

476 0

मुंबई – सीबीआयने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आपल्या ताब्यात घेतलं आहे. आज सकाळी अनिल देशमुख यांची जेजे हॉस्पिटलमधून सुटका झाली. त्यानंतर आर्थर रोड जेल येथून देशमुख यांना ताब्यात घेतले असून कोर्टात हजर केले जाणार आहे.

गेल्या आठवड्यात मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने दरमहा 100 कोटींच्या वसूली प्रकरणी सचिन वाझे, संजीव पालांडे, कुंदन शिंदे आणि अनिल देशमुख या चौघांचा ताबा घेण्याची परवानगी तपास यंत्रणेला दिली होती. त्यानुसार सीबीआयने सचिन वाझेसह पालांडे आणि शिंदे या देशमुखांच्या दोन सहाय्यकांना सोमवारी (4 एप्रिल) सीबीआयकडून अटक करण्यात आली. अटकेनंतर या तिघांनाही मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टापुढे हजर केलं असता कोर्टाने या तिघांना सात दिवसांची सीबीआय कोठडी मंजूर केली. मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी अनिल देशमुख अचानक जेजे रुग्णालयात दाखल झाल्याने त्यांना सीबीआय त्यांचा ताबा घेऊ शकली नाही.

मात्र मंगळवारी (5 एप्रिल) देशमुखांना डिस्चार्ज दिल्याने सीबीआय ताबा घेण्याआधीच देशमुखांनी त्याविरोधात हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. परंतु या याचिकेवरील सुनावणीआधीच सीबीआयने आर्थर रोड तुरुंगातून अनिल देशमुख यांना ताब्यात घेतले.

1 नोव्हेंबर रोजी ईडीने देशमुखांना अटक केली. तेव्हापासून देशमुख आर्थर रोड कारागृहात आहेत. 29 डिसेंबर 2021 रोजी ईडीने देशमुखांसह अन्य आरोपींविरोधात पुरवणी आरोपपत्र आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्या (पीएमएलए)अंतर्गत विशेष न्यायालयात दाखल केलेलं आहे. सुमारे सात हजार पानांचे आरोपपत्र असून या प्रकरणातील हे दुसरे आरोपपत्र होतं. मुंबई सत्र न्यायालयाने अनिल देशमुखांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर देशमुखांनी हायकोर्टात जामीनासाठी याचिका दाखल केलीय, ज्यावर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे.

Share This News

Related Post

Top News Marathi Logo

Maharashtra Political Crises : “अब सभी को सभी से खतरा है…!” संजय राऊतांचे ‘ते’ ट्विट चर्चेत

Posted by - July 12, 2022 0
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा संभाळल्यानंतर मंत्रिमंडळ स्थापन करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र सर्वोच्च न्यायालयाचा…
Manoj Jarange Patil

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला ‘या’ कारणामुळे पोलिसांनी नाकारली परवानगी

Posted by - June 7, 2024 0
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आमरण उपोषण करुन राज्यभरात रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे.…

भयानक : 31 डिसेंबरची रात्र त्या तरुणांसाठी ठरली काळरात्र ! दारुड्यांनी मागितलेले शंभर रुपये दिले नाहीत म्हणून तरुणाचा मनगटापासून तोडला हात, आणि मग …

Posted by - January 2, 2023 0
पुणे : पुण्यातील हि घटना ऐकून अक्षरशः अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. अगदी एखाद्या चित्रपटांमध्ये साकारला जावा असा हा सीन…
Bhandara Viral Video

Bhandara Viral Video : ‘पाटलांचा बैलगाडा’ अन् अजित पवार गटाच्या सभापतीचा राडा; तरुणीसोबतचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

Posted by - November 24, 2023 0
भंडारा : भंडारा (Bhandara Viral Video) जिल्ह्यातील एका कार्यक्रमात तरुणीचा न्यूड डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी आयोजकांवर गुन्हा…

पंढरपुरात खासदार धनंजय महाडिक यांना मोठा धक्का; 11 पैकी सात ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीची सत्ता

Posted by - December 20, 2022 0
पंढरपूर : राज्यात आज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा टप्प्याटप्प्याने निकाल जाहीर होतो आहे. आज राज्यातील 7000 हुन अधिक ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *