भाजपा नेते डॉ. अनिल बोंडे यांना तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा, १० हजारांचा दंड

561 0

अमरावती – राज्याचे माजी मंत्री भाजपा नेते डॉ. अनिल बोंडे यांना अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाने तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. वरुडच्या तहसीलदारांना 30 मे 2016 रोजी कार्यालयात जाऊन शिवीगाळ केल्याच्या प्रकरणात आज न्यायालयाने ही शिक्षा आणि दंड ठोठावला आहे.

संजय गांधी निराधार योजनेत एकूण 240 प्रकरणांमध्ये त्रुटी काढल्यामुळे वरूडचे नायब तहसीलदार नंदकिशोर काळे यांना जाब विचारण्यासाठी डॉ. अनिल बोंडे हे कार्यकर्त्यांसह दुपारी तहसील कार्यालय धडकले होते. यावेळी डॉक्टर अनिल बोंडे यांनी तहसीलदारांना शिवीगाळ करीत तुला जिवंत राहायचे नाही का, तू माझ्या कार्यकर्त्यांचे काम केले नाही. अशा शब्दात तहसीलदार नंदकिशोर काळे यांना धमकावले होते.

तसेच कार्यालयातील शासन निर्णयाच्या प्रती आणि शासकीय फाईल पाडून टाकल्या होत्या. या प्रकाराबाबत नंदकिशोर काळे यांनी वरुड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केल्यावर 11 मे 2017 रोजी जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. डॉक्टर अनिल बोंडे यांना कलम 332 अंतर्गत दोषी ठरविले. जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना तीन महिने कारावासाच्या शिक्षेसह दहा हजार रुपये दंड ठोठावला आहे.

Share This News

Related Post

Loksabha Election

Loksabha Election : जागा वाटपाचा तिढा सुटेना; ‘या’ 10 जागांसाठी दिग्गजांची रस्सीखेच सुरू

Posted by - March 24, 2024 0
मुंबई : लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरू झाली आहे. परंतु जागा वाटपाचा तिढा मात्र अजूनही सुटताना दिसत नाही. राज्यात…

श्री शंकर महाराज समाधी ट्रस्टच्या अध्यक्षपदी सुरेंद्र वाईकर सचिवपदी सतीश कोकाटे

Posted by - May 14, 2022 0
पुणे- पुणे सातारा रोडवरील श्री सदगुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज समाधी ट्रस्टच्या त्रैवार्षिक निवडणुकीत ट्रस्टच्या अध्यक्षपदी सुरेंद्र वाईकर यांची तर…

राज ठाकरे यांच्या भाषणाचा आढावा घेणार, आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत गृहमंत्र्यांची बैठक

Posted by - May 2, 2022 0
मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेनंतर गृह खात्याने राज ठाकरे यांच्या भाषणाचा परामर्श घेण्यास सुरुवात केली आहे.…

मार्चमध्ये प्रदर्शित होणारे चित्रपट : बॉलिवूडसह हॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपट धमाल उडवतील, पाहा संपूर्ण यादी

Posted by - March 3, 2023 0
बॉलिवूडसाठी जानेवारी आणि फेब्रुवारी चांगलं गेलं नाही. शाहरुख खानचा पठाण वगळता एकाही चित्रपटाने प्रेक्षकांना प्रभावित केले नाही. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर…
Nashik Crime

Nashik Crime : नाशिकमध्ये डॅाक्टरवर कोयत्याने केले वार; मन विचलित करणारा Video समोर

Posted by - February 24, 2024 0
नाशिक : नाशिक जिल्ह्यातून (Nashik Crime) एक खळबळ जनक घटना समोर आली आहे. यामध्ये एका रुग्णालयात डॉक्टरवर जीवघेणा हल्ला करण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *