विश्लेषण : कसबा,चिंचवडची पोटनिवडणूक महाविकास आघाडी आणि भाजपासाठी का आहे प्रतिष्ठेची ?

398 0

भाजपाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकांची घोषणा 18 जानेवारी रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून करण्यात आली ही निवडणूक जाहीर झाल्यापासून विविध कारणांनी कसबा चिंचवडचा मतदार संघ चर्चेत आलाय….

अगदी या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध होणार का अशा चर्चा रंगल्या असतानाच भाजपाकडून आम्ही बिनविरोध साठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचं सांगण्यात येत होतं तर महाविकास आघाडीकडून निवडणूक होणारच अशी भूमिका मांडण्यात आली होती.

उमेदवार कोण यावरून तिढा

अगदी सुरुवातीला कसबा पेठ आणि चिंचवड साठी उमेदवार कोण असणार याचाच तिढा भाजपा आणि महाविकास आघाडी समोर असल्याचं पाहायला मिळालं इच्छुकांची भाऊगर्दी दोन्ही ठिकाणी पाहायला मिळाली. कसब्यात भाजपाकडून दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक मुलगा कुणाला टिळक गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट, माजी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृह नेते गणेश बिडकर, धीरज घाटे यांची नावे भाजपाकडून चर्चेत होती. तर महाविकास आघाडी मधील तीनही पक्षांनी कसब्यावर आपला दावा सांगितला होता.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुरुवातीलाच ॲड रूपाली पाटील-ठोंबरे यांनी कसबा पोट निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर काँग्रेसकडून तब्बल 16 जणांनी कसब्याची पोटनिवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून माजी नगरसेवक विशाल धनवडे उप शहरप्रमुख बाळासाहेब मालुसरे व पुणे शहर प्रमुख संजय मोरे यांनी देखील कसब्यातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. तर चिंचवडमध्ये देखील लक्ष्मण जगताप यांच्या घरातच पत्नी अश्विनी जगताप आणि भाऊ शंकर जगताप असे दोघं जण इच्छुक होते. तर महाविकास आघाडीकडून चिंचवड पोटनिवडणूकीसाठी देखील तीनही पक्ष इच्छुक होते

अखेर उमेदवार ठरला

7 फेब्रुवारी ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असताना आणि कसबा,चिंचवडमध्ये उमेदवार कोण याची उत्कंठा शिगेला पोहोचली असतानाच 4 फेब्रुवारीला भाजपाच्या दिल्लीतील मुख्यालयातून कसबा, आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली. भाजपाकडून कसब्यात हेमंत रासने तर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. भाजपचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडी कडून कसबा काँग्रेस लढणार तर चिंचवड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस लढणार अशी भूमिका स्पष्ट करण्यात आली त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार कोण असणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या असताना 6 फेब्रुवारीला रात्री उशिरा कसब्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली तर अर्ज भरण्यासाठी शेवटचे काही तास शिल्लक असताना 7 फेब्रुवारीला चिंचवड मधून विठ्ठल उर्फ नाना काटे यांना महाविकास आघाडी कडून उमेदवारी देण्यात आली.

कसबा,चिंचवडमध्ये बंडखोरीचं ग्रहण

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडी समोर बंड थोपवण्याचा मोठा आव्हान होता कारण रवींद्र धंगेकर यांच्या उमेदवारांना नाराज झालेल्या पुणे शहर काँग्रेस मधील ज्येष्ठ नेते आणि शहराचे वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब दाभेकर यांनी अपक्ष म्हणून आपला अर्ज दाखल केला तर चिंचवडमध्ये राहुल कलाटे यांनी आपला अपक्ष अर्ज दाखल केला. पुढे घडलेल्या अनेक नाट्यमय घडामोडीनंतर आणि थेट राहुल गांधींनी फोन केल्यानंतर कसब्यातून बाळासाहेब दाभेकर यांनी अर्ज माघारी घेतला चिंचवड मध्ये मात्र राहुल कलाटे आपल्या उमेदवारीवर ठाम राहिल्याचं पाहायला मिळालं यामुळेच चिंचवड मध्ये तिरंगी तर कसब्यामध्ये दुरंगी लढत होणार हे जवळपास स्पष्ट झालं.

प्रचार यंत्रणा सज्ज

कसबा पेठ आणि चिंचवडची पोट निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपा आणि महाविकास आघाडी करून आपली तगडी फौज मैदानात उतरवण्यात आले असून भाजपाकडून एक दोन नव्हे तर तब्बल 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्याकडून देखील आपले स्टार प्रचारक मैदानात उतरवले असून दस्तूरखुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील कसबा आणि चिंचवडच्या मैदानात उतरले आहेत. तर आजारी असूनही पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी कसब्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत ही निवडणूक चुरशीची नसून आपला विजय निश्चित होणार आहे असा विश्वास व्यक्त केला. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपाचे संकटमोचक अशी ज्यांची ओळख आहे ते राज्याचे क्रीडा व ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन हे देखील कसबा आणि चिंचवडवर बारीक लक्ष ठेवून असल्याचे बोललं जात आहे.

एकंदरीतच कसबा व चिंचवड पोटनिवडणुकीकडे आगामी काळातील लोकसभा आणि विधानसभेची त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणाऱ्या निवडणुकांची लिटमस टेस्ट म्हणून पाहिलं जात असून त्या दृष्टीनेच महाविकास आघाडी आणि भाजपाकडून ही संपूर्ण निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे कसबा आणि चिंचवड मध्ये अटीतटीची लढत होत असून 26 फेब्रुवारीला मतदान तर 2 मार्चला मतमोजणी होणार आहे कसबा व चिंचवडची जनता पुन्हा भाजपाच्याच पाठीशी उभी राहणार की कसबा आणि चिंचवड मध्ये परिवर्तन होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल

– संकेत देशपांडे,
रिपोर्टर, TOP NEWS मराठी

Share This News

Related Post

सार्वजनिक तक्रारींचे निवारण करण्याची कालमर्यादा 45 दिवसांवरून 30 दिवसांवर

Posted by - August 1, 2022 0
नवी दिल्ली : कमीतकमी वेळेत शक्य तितक्या लवकर तक्रारींचा निपटारा करून, तक्रारदाराच्या अधिकाधिक समाधानाच्या अनुषंगाने सार्वजनिक तक्रार निवारण यंत्रणेच्या प्रभावी…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रवेश प्रक्रिया; प्रवेशासाठी उरले फक्त चार दिवस..!

Posted by - July 8, 2022 0
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची शैक्षणिक वर्ष २०२२-२३ ची नियमित प्रवेश प्रक्रिया १५ जूनपासून सुरू झाली असून या प्रवेशप्रक्रियेअंतर्गत जवळपास…

#VIRAL VIDEO : व्हिडिओ पाहून अक्षरशः अंगावर काटा येईल; महिलेच्या तोंडातून डॉक्टरांनी काढला चार फुटाचा जिवंत साप

Posted by - March 6, 2023 0
सोशल मीडियावर रोजच चित्र विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशातच सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. यामध्ये…
Chhatrapati Sambhajiraje

Pune News : शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा : स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे

Posted by - June 13, 2024 0
पुणे : स्वराज्य पक्षाकडून वाढीव दराने खते विकणार्‍यांविरोधात स्टिंग ऑपरेशन करण्यात आले. यानंतर स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे (Pune News) यांनी पत्रकार…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली खासदार गिरीश बापट यांच्या प्रकृतीची विचारपूस

Posted by - August 3, 2022 0
पुणे: पुण्याचे भाजपचे खासदार गिरीश बापट सध्या रुग्णालयात उपचार घेत असून, मंगळवारी रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *