#PUNE : दुर्दैवी घटना ; इलेक्ट्रिक फिडरच्या संपर्कात आल्याने अज्ञात इसमाचा मृत्यू

2717 0

पुणे : आज दिनांक ०९\०२\२०२३ रोजी सकाळी ०८•४४ वाजता अग्निशमन दल नियंत्रण कक्ष येथे नगर रस्ता, चंदननगर, ९ बीआरडी जवळ इलेक्ट्रिक शॉक लागून एक इसम जखमी अवस्थेत असल्याची वर्दि मिळताच येरवडा अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले होते.

अग्निशमन दलाचे वाहन पोहोचताच जवानांनी पाहिले की, सदर ठिकाणी ९ बीआरडी अग्निशमन विभागाचे एक अग्निशमन वाहन दाखल झाले आहे. तसेच घटनास्थळी एक इसम जखमी अवस्थेत लाल रंगाचा इलेक्ट्रिक फिडर असलेल्या ठिकाणी पडलेला आहे. त्याचवेळी जवानांनी क्षणाचा ही विलंब न करता महावितरण अधिकारी व कर्मचारी यांना सर्व विद्युत प्रवाह तातडीने बंद करण्यास सांगून व खाञी करुन सदर जखमी इसमास अग्निशमन उपकरण सिलिंग हुक व दोरीच्या साह्याने फिडरच्या येथून जखमी अवस्थेत बाहेर काढले व त्याचवेळी तिथे उपस्थित असणारया पोलिसांच्या ताब्यात देऊन लगेच रुग्णवाहिकेतून रुग्णालयात रवाना केले.

तसेच त्याठिकाणी किरकोळ स्वरूपात गवत पेटले असल्याने त्यावर पाणी मारुन आग पुर्ण विझवली. सदर घडलेल्या घटनेमधे जखमी इसमाला ससून रुग्णालयात नेले असता मृत झाल्याचे समजले. मृत इसमाचे नाव व नेमकी घटना कशी घडली याचा तपास पोलिस करीत आहेत.

 

Share This News

Related Post

Medicines

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! धोकादायक 14 फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन औषधांवर बंदी

Posted by - June 3, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने 14 औषधांवर बंदी घातली आहे. डीजीसीआय (DCGI) म्हणजेच भारतीय औषध नियामक मंडळाने (Drugs…

पीएम किसान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे E-KYC मोहिमस्तरावर करा-जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

Posted by - July 27, 2022 0
पुणे : ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांचे ई-केवायसी आणि बँक खाते आधारशी जोडण्याचे काम मोहिमस्तरावर करावे, असे निर्देश…

पुण्यात विद्युत मोटार कंपनीला आग ; अग्निशमन दलाच्या 5 गाड्यांनी आग आटोक्यात

Posted by - June 15, 2022 0
पुणे- पुणे महापालिकेजवळ असलेल्या विद्युत मोटार कंपनीच्या तळमजल्यावरील 3 हजार स्क्वेअर फूटच्या रेकॉर्ड रूमला आज बुधवारी सकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास…

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुन्हा मोफत बससेवा

Posted by - July 24, 2022 0
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कोरोनानंतर विद्यार्थ्यांची वर्दळ वाढली असून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विद्यापीठाने पुन्हा एकदा विद्यापीठ परिसरात मोफत बससेवा देण्यास…
Tukaram Maharaj Palkhi

Tukaram Maharaj Palkhi : तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील अश्वाचे पहिले गोल रिंगण इंदापूरमध्ये पार पडले

Posted by - June 20, 2023 0
इंदापूर : जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी (Tukaram Maharaj Palkhi) सोहळ्यातील अश्वाचे पहिले गोल रिंगण इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *