अमरावतीमध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना जोडे दाखवण्याचा प्रयत्न; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात; वाचा आत्ताची मोठी बातमी

232 0

अमरावती : अमरावतीमध्ये आज भगतसिंह कोश्यारी यांना चप्पल दाखवण्याचा प्रयत्न ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

दरम्यान महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी केलेल्या अवमान कारक वक्तव्यामुळे महाराष्ट्राचे वातावरण अनेक दिवसांपासून गढूळ झालेले आहे. असं असतानाच आज पुन्हा एकदा अमरावतीमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी भगत सिंह कोश्यारी यांना चप्पल दाखवून निषेध व्यक्त केला.

महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मध्य प्रदेशचे राज्यपाल आज अमरावती दौऱ्यावर आहेत. सीमालागत भागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासंदर्भात मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल यांच्याशी आज कोश्यारी यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेलगत असलेल्या जिल्ह्यात संदर्भात त्याचबरोबर गुन्हेगारी विषयक कारवायांवर महत्त्वाची बैठक आज होणार आहे. यावेळी बैठक सुरू असताना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जमाव केला राज्यपाल ज्या रस्त्यावरून मार्गस्थ होणार होते, या रस्त्यावरच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी चप्पल दाखवून त्यांचा निषेध करणार होते. मात्र पोलिसांनी वेळेत कार्यकर्त्यांना ताब्यात घेतला आहे.

गेली अनेक दिवसांपासून राज्यपाल भगतसिंह कोशारी यांचे हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्रामध्ये जोर धरते आहे. महाविकास आघाडीने अनेक आंदोलने केली. मोर्चे निघाले परंतु अद्याप तरी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

 

Share This News

Related Post

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात

Posted by - December 19, 2022 0
नागपूर: आजपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. सीमाप्रश्न, पीक विम्यातील शेतकऱ्यांची फसवणूक, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी,…

केंद्राची ‘पीएम कुसूम योजना’ कागदावरच! ; राज्यात 1 लाख सौर पंप मंजूर,पण बसवले केवळ 7,713

Posted by - July 23, 2022 0
मुंबई : शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी व भारनियमनापासून मुक्ती मिळावी म्हणून केंद्र सरकारने पीएम कुसूम योजना सुरू केली. या…

एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराला मंत्रीपद; मंत्रीपदासाठी फोन आलेले खासदार प्रतापराव जाधव नेमके कोण आहेत ? वाचा सविस्तर

Posted by - June 9, 2024 0
आज नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. त्यांच्या या शपथविधी वेळी काही मंत्रांचा शपथविधी देखील होणार आहेत.…

#HEALTH : आयुर्वेदात काही पदार्थ जड मानले आहेत ; ‘या’ पदार्थांचे सेवन करताना सावधान

Posted by - February 9, 2023 0
काही पदार्थ आपण जवळजवळ दररोज खात असतो, जसे की कोशिंबीर. मात्र आयुर्वेदात काही पदार्थ जड मानले आहेत. म्हणजेच त्यांचे दररोज…

गद्दारांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम करणार ! संजय राऊत यांचा इशारा

Posted by - June 28, 2022 0
अलिबाग- महाराष्ट्रात शिवसेना संपवण्याचे कारस्थान सुरू आहे. 56 वर्षे शिवसेना उभी आहे. शिवसेनेचा इतिहास आहे ज्यांनी बाळासाहेबांशी गद्दारी केले त्याचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *