वेदांता-फॉक्सकॉनसंदर्भात फडणवीसांकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न ! अतुल लोंढे

262 0

मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणी भारतीय जनता पक्षाकडून जनतेची दिशाभूल केली जात आहे. हा प्रकल्प शिंदे फडणवीस सरकारच्या नाकर्तेपणामुळेच गुजरातमध्ये गेला आहे पण त्याचे खापर मात्र महाविकास आघाडी सरकारवर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. वेदांता व वेदांता-फॉक्सकॉन हे दोन वेगळे प्रकल्प आहेत पण फडणवीसांकडून याबाबत जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत वेदांताच्या गुंतवणुकीसंदर्भात खोटी माहिती दिली. वेदांताचा प्रकल्प फडणवीस यांच्या काळातच आला आणि गेला, तो प्रकल्प मोबाईलचा होता तर वेदांता-फॉक्सकॉन हा १ लाख ५६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक व १ लाख रोजगार निर्माण होणारा प्रकल्प होता, हा प्रकल्प सेमी कंडक्टरचा होता. यासंदर्भात १५ जुलै २०२२ रोजी सचिवांची उच्चस्तरिय बैठक झाली, सहा-सात विभागाच्या सचिवांचा या बैठकीत सहभाग होता. या उच्चस्तरिय बैठकीत वेदांता-फॉक्सकॉनला किती व कोणत्या सवलती द्यायच्या याचे निर्णय झाले. पाणी, वीज, जमीन, विविध कर यामध्ये सवलती देण्यावर निर्णय झाला.

वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणी एका व्यक्तीने माहिती अधिकाराखाली अर्ज केला व त्या व्यक्तिला विशेष जलतगती सेवा देत त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत माहिती देण्यात आली. फडणवीस हे पुन्हा पुन्हा खोटे बोलण्याचा अश्लाघ्य प्रकार करत असून आरटीआय मधूनही त्यांनी तेच केले. आपल्या हातून झालेल्या चुका लपवण्यासाठी ही धडपड सुरु आहे. शिंदे-फडणवीस सरकार चुका लपवण्याचे काम करत आहे. फडणवीसांच्या काळात १६ लाख कोटींचे करार झाले होते पण १६ रुपयांचीही गुंतवणूकही आली नाही.

महाराष्ट्रात पक्षीय राजकारण न करता जास्तीत जास्त गुंतवणूक व जास्त रोजगार आणले पाहिजेत, यासाठी विरोधी पक्षही सरकारला मदत करण्यास तयार आहे पण भाजपाचे राजकारण हे धर्मावर व श्रेय लाटण्याचे राजकारण आहे. तसेच १२ कोटी जनतेला धोका कसा द्यायचा हेच भाजपा व फडणवीस यांचे राजकारण आहे आणि आम्ही त्यांचा निषेध करतो, असेही लोंढे म्हणाले.

Share This News

Related Post

Gunaratna Sadavarte

Maratha Reservation : ‘गाड्या फोडण्यापेक्षा गुणरत्न सदावर्तेलाच…’ शिंदे गटाच्या ‘या’ आमदाराचे खळबळजनक वक्तव्य

Posted by - October 26, 2023 0
मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा मोठ्या प्रमाणात पेटताना दिसत आहे. एकीकडे आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा…
sharad pawar and ajit pawar

‘या’ कारणामुळे पवारांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित नव्हतो; अजित पवारांचा खुलासा

Posted by - May 7, 2023 0
पुणे : शरद पवार यांनी आपल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठी खळबळ उडाली…

मंत्रालयात वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांचा विनयभंग करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नि:पक्षपातीपणाने चौकशी व्हावी – डॉ. नीलम गोऱ्हे

Posted by - October 29, 2022 0
मुंबई : मुंबईत मंत्रालयात इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या विभागामध्ये अवर सचिव स्तरावर असणारा अधिकाऱ्यांनी एका उपसंचालक दर्जाच्या महिला भगिनीला…
Jalgaon News

Jalgaon News : जळगावमध्ये एका महाविद्यालयीन तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

Posted by - June 30, 2023 0
जळगाव : जळगावमध्ये (Jalgaon News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये (Jalgaon News)रावेर तालुक्यातील वडगाव येथील महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तरुणीने…

पतीला प्रेयसी सोबत राहायचे होते. म्हणून दोघांनी पत्नीचे हातपाय बांधून….

Posted by - April 28, 2023 0
आपल्या प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पत्नीला संपवण्यासाठी पतीने आणि त्याच्या प्रेयसीने पत्नीचे हातपाय बांधून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पण पत्नीने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *