अक्षय्य तृतीयेनिमित्त महालक्ष्मीला’ मोग-यासह सुवासिक फुलांचा अभिषेक

279 0

पुणे – सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरात अक्षय्य तृतीयेनिमित्त महालक्ष्मीला’ मोग-यासह सुवासिक फुलांचा अभिषेक करण्यात आला. मोग-यासह सुवासिक फुलांचा श्री महालक्ष्मी देवीला घातलेला पोशाख… श्री महासरस्वती व श्री महाकाली देवीचे पुष्पाभिषेक केल्यानंतर दिसणारे विलोभनीय रुप… मंदिराचा गाभारा व सभामंडपातील विविधरंगी पुष्पांची आरास पाहण्याकरिता देवीभक्तांनी गर्दी केली. यावेळी आंबा महोत्सव देखील साजरा करण्यात आला.

श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने अक्षयतृतीयेच्या निमित्ताने वासंतिक मोगरा व आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, हेमंत अर्नाळकर, विश्वस्त नगरसेवक प्रविण चोरबेले आदी उपस्थित होते.

मोग-याच्या फुलांनी मंदिराचा परिसर खुलून गेला होता. तब्बल १५१ किलो मोगरा, २५१ गुलाबाच्या फुलांच्या गड्डया, चाफा, जाई-जुई, गुलछडी, झेंडू यांसह अनेक फुलांची आरास करण्यात आली. तसेच मंदिरात आंबा महोत्सव देखील साजरा करण्यात आला. तब्बल २ हजार आंब्याचा महानैवेद्य देवीला दाखविण्यात आला होता. श्री महालक्ष्मी देवीसह श्री महासरस्वती व श्री महाकाली देवीसमोर आंब्याचा महानैवेद्य दाखविण्यात आला. फुलांची आरास आणि आंबा महोत्सव पाहण्याकरिता पुणेकरांनी मोठया संख्येने गर्दी केली. सामाजिक संस्थांना आंबे प्रसाद म्हणून देणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.

Share This News

Related Post

AJIT PAWAR

MAHARASHTRA POLITICS : जेव्हा अजित पवार कडाडतात ; “…म्हणून सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर बहिष्कार…! ” वाचा काय म्हणाले आहेत अजित पवार …

Posted by - August 16, 2022 0
सत्ताधाऱ्यांवर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे . सध्या राज्यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेणे आणि ते…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचं घेतलं दर्शन

Posted by - September 2, 2022 0
पुणे: दोन वर्षानंतर राज्यात गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. सामान्य नागरिक ते वेगळ्या पक्षातील नेते वेगवेगळ्या मंडळांना भेट…

पुनरागमनाय च ! आज गणरायाला निरोप देण्याचा दिवस ; मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी …

Posted by - September 9, 2022 0
गणेश चतुर्थीला गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. श्री गणेशाच्या प्रतिष्ठापना विधीमध्ये पार्थिव मूर्तीच आवाहन, स्नान, अभिषेक, वस्त्र, चंदन, फुले, पत्री,…
Police Transfer

पुण्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

Posted by - June 17, 2023 0
पुणे : महाराष्ट्र राज्य गृह विभागाने राज्यातील 449 पोलिस निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या केल्या आहेत. यामध्ये काही निरीक्षकांच्या बदल्या विनंतीवरून तर…

“भारताच्या सामर्थ्यामुळे हताश पाकिस्तानचे मोदीजींविषयी वक्तव्य…!” प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

Posted by - December 17, 2022 0
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत सामर्थ्यशाली झाला आहे. पाकिस्तान भारतात दहशतवादी कारवाया करू शकत नाही तसेच भारताकडे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *