cm eknath shinde

CM EKNATH SHINDE : वन्यजीवांच्या संवर्धनासोबतच ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होणार नाही याची दक्षता घ्यावी

164 0

मुंबई : राज्यात १८ नवीन आणि ७ प्रस्तावित संवर्धन राखीव क्षेत्र घोषीत करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मान्यता दिली. त्यामुळे महाराष्ट्रात संवर्धन राखीव क्षेत्रांची संख्या ५२ होणार आहे. त्यामाध्यमातून राज्यात सुमारे १३ हजार चौरस किलोमीटर क्षेत्र संरक्षित होण्यास मदत होणार आहे. अशा संवर्धन राखीव क्षेत्रातील वन्यजीवांचे संवर्धन करताना त्या भागातील ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनात अडचण येणार नाही, त्यांचे हक्क बाधीत होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.

मंत्रालयात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाची १९ वी बैठक झाली. यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. वाय. एल. पी. राव, वन्यजीव मंडळाचे सदस्य सचिव तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये आदी यावेळी उपस्थित होते.

या बैठकीत राज्यात १८ नवीन संवर्धन राखीव क्षेत्र घोषीत करण्यात आली. त्यामध्ये पुणे आणि रायगड जिल्ह्यातील वेल्हे-मुळशी (८७.४१ चौरस कि.मी.) आणि लोणावळा (१२१.२० चौरस कि.मी.), पुणे-ठाणे जिल्ह्यातील नानेघाट ( ९८.७८ चौरस कि.मी.), पुणे जिल्हा भोरगिरीगड (३७.६४ चौरस कि.मी.), नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी (६२.१० चौरस कि.मी.), सुरगाणा (८६.२८चौरस कि.मी.), ताहाराबाद (१२२.४५ चौरस कि.मी.), नंदूरबार जिल्ह्यातील कारेघाट (९७.४५ चौरस कि.मी.), चिंचपाडा (९३.९१ चौरस कि.मी.), रायगड जिल्ह्यातील घेरा माणिकगड (५३.२५ चौरस कि.मी.) व अलिबाग (६०.०३ चौरस कि.मी.), पुणे जिल्ह्यातील राजमाची (८३.१५ चौरस कि.मी.), ठाणे जिल्ह्यातील गुमतारा (१२५.५० चौरस कि.मी.), पालघर जिल्ह्यातील जव्हार (११८.२८ चौरस कि.मी.), धामणी (४९.१५ चौरस कि.मी.), अशेरीगड (८०.९५ चौरस कि.मी.), सांगली जिल्ह्यातील आटपाडी (९.४८ चौरस कि.मी.), चंद्रपूर जिल्ह्यातील एकारा (१०२.९९ चौरस कि.मी.) यांचा समावेश आहे.

राष्ट्रीय उद्यानालगत आणि अभयारण्यालगत किंवा दोन संरक्षित क्षेत्र जोडणाऱ्या भूप्रदेशातील प्राणी, वनस्पती यांच्या अधिवासाचे संरक्षण करण्याच्या हेतूने संवर्धन राखीव क्षेत्र घोषीत केली जातात. प्रस्तावित संवर्धन राखीव क्षेत्रांमध्ये नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गड, ठाणे जिल्ह्यातील मोरोशीचा भैरवगड, औरंगाबाद जिल्ह्यातील धारेश्वर, त्रिकुटेश्वर, कन्नड, पेडकागड तर नांदेड जिल्ह्यातील किनवटचा समावेश आहे.

Share This News

Related Post

BREAKING : शिंदे गटाची ‘बाळासाहेबांची शिवसेना’, तर उद्धव ठाकरेंना मिळालं पक्षासाठी ‘हे’ नाव ; वाचा सविस्तर

Posted by - October 10, 2022 0
मुंबई : आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असं नाव मिळाल आहे. तर उद्धव ठाकरेंच्या गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब…
Crime News

Crime News : शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील काका पुतण्याची हत्या

Posted by - July 28, 2023 0
धुळे : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मलगाव शिवारातील पिपल्यापाडा येथे शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील दोन गटात तुफान हाणामारी (Crime News)…
Kirit somayya

‘विक्रांतसाठी गोळा केलेला निधी कुठे गेला ?’ या प्रश्नावर सोमय्यांनी गुंडाळली पत्रकार परिषद

Posted by - April 7, 2022 0
मुंबई- शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर विक्रांतप्रकरणी भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात…

#VIDEO : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणते, ” भारतातल्या मुली आळशी, त्यांच्या अपेक्षा अवाजवी…!” तुमचं मत काय ?

Posted by - March 16, 2023 0
काळ बदलला तसं मुली देखील स्वतः कमावून आणि घराला हातभार लावणं यास महत्त्व देतात. एकीकडे मुलींनी वेळेत लग्न करावं, मुलं…

अखेर ठरलं! महादेव जानकर परभणीतून लढवणार लोकसभा निवडणूक

Posted by - March 30, 2024 0
माझी पशुपालन व दुग्धविकास मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी 24 मार्च रोजी महायुतीमध्ये राहण्याचा निर्णय जाहीर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *