17 तासांच्या अज्ञातवासानंतर अजितदादा प्रकटले ! सर्वांचा एकच प्रश्न….एवढे तास कुठे होते ?

621 0

राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे काल दुपारी अचानक गायब झाले. सर्व कार्यक्रम रद्द करून अजित पवार नॉट रिचेबल झाल्याने चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आता तब्बल १७ तासानंतर अजितदादा पुन्हा प्रकट झाले असल्याने सर्वानी सुटकेचा निश्वास टाकला आहे. मात्र एवढे तास दादा होते कुठे या प्रश्नाने सर्वाना भंडावून सोडले आहे.

अजितदादा काल बारामती हॉस्टेवरून निघाले होते. ते दुपारी कोरेगाव पार्कमध्ये आले. त्यानंतर त्यांनी त्यांनी दुपारपर्यंत कात्रज दूध संघातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या. त्यानंतर त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवादही साधला. जेवण झाल्यानंतर ते केशवनगर येथील त्यांच्या नियोजित कार्यक्रमासाठी रवानाही झाले. त्यांच्या वाहनांचा ताफा नियोजित कार्यक्रमाच्या अलीकडे दीड ते दोन किलोमीटर अंतरावर पोहोचला होता. त्यांच्या कारमध्ये ते, त्यांचे स्वीय सहायक आणि चालक असे तिघेच होते. त्यांची कार थांबली, त्या ठिकाणी त्यांनी नारळपाणीही घेतले. फोनवर बोलत असताना त्यांनी अचानक आपले दोन दिवसांचे कार्यक्रम रद्द केले आणि ते पोलिस बंदोबस्त सोडून आपल्या खासगी दौऱ्यावर निघून गेले. नियोजित कार्यक्रमांना शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार चेतन तुपे; तसेच इतर स्थानिक नेत्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

अजितदादांनी अचानक कार्यक्रम रद्द केले. त्यांचा मोबाईलही लागत नव्हता. त्यामुळे चर्चांना उधाण आले होते. त्यांच्यासोबत सात आमदार असल्याच्या चर्चाही होत्या. त्यामुळे अजित पवार पुन्हा बंडाच्या तयारीत आहेत की काय अशी चर्चा होती. अखेर १७ तासानंतर अजितदादा दिसले आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासोबत खराडीमध्ये.

अजित पवार हे पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासोबत सकाळी पुण्यातील खराडी भागात आले होते. येथील एका ज्वेलरी शोरूमचं अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांनी शोरूममधील दागिन्यांची पाहणी केली. या दागिन्यांची माहिती घेतली. त्यामुळे अजित पवार हे पुण्यातच असावेत किंवा अजितदादा मुंबईवरून रात्री पुण्यात आले असावेत असंही सांगितलं जात आहे.

यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात अशीच घटना घडली; तेव्हा त्यांनीच खुलासा करून परदेशात असल्याची माहिती दिली होती. याशिवाय २०१९च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी अशाच प्रकारे गायब होऊन, त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामाच थेट विधानसभा अध्यक्षांकडे पाठवला होता. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दौरा अर्धवट सोडून ते अज्ञातस्थळी गेल्याने जोरदार चर्चा रंगली होती.

Share This News

Related Post

#PUNE : शिवाजी नगर व विश्रामबाग वाहतूक विभागाअंतर्गत पार्कींगबाबत आदेश निर्गमित

Posted by - March 3, 2023 0
पुणे : पुणे शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीत होण्याच्यादृष्टीने शिवाजीनगर वाहतूक विभाग आणि विश्रामबाग वाहतूक विभागांतर्गत पार्किंगबाबत काही अंतिम आदेश…

#UDDHAV THACKREY : आगामी 2024 ची निवडणूक शेवटची असेल त्यानंतर देशात हुकूमशाही उद्धव ठाकरेंची भाजपवर जहरी टीका

Posted by - February 20, 2023 0
मुंबई : जिल्हाप्रमुखांच्या बैठकीनंतर शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपवर कडाडून टीका…

राजकुमार संतोषींचा “गांधी गोडसे एक युद्ध” प्रदर्शनाच्या शर्यतीत; नथुरामच्या भूमिकेत मराठमोळा चिन्मय मांडलेकर झळकणार; पहा फर्स्ट लूक

Posted by - December 27, 2022 0
इतिहासातील एक असं पान जे कोणताही भारतीय विसरू शकणार नाही. लवकरच मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. दामिनी, घायल, घातक अशा…
Transportation

Republic Day 2024 : मुंबईतील वाहतुकीत बदल; ‘हे’ रस्ते वाहतुकीसाठी असणार बंद

Posted by - January 26, 2024 0
मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने (Republic Day 2024) मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. वाहतूक व्यवस्था नियोजित करण्यासाठी पोलिसांनी अधिसूचना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *