‘३१ मार्च पर्यंत कामावर हजार व्हा, अन्यथा…’ अजितदादांची एसटी कामगारांना डेडलाईन

129 0

पुणे- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपावरील एसटीच्या कर्मचाऱ्यांना आवाहन केले आहे. एसटी कामगारांनी कामावर परतावं. जे निलंबित झालेत, ज्यांच्यावर कारवाई केली त्यांना पुन्हा कामावर रुजू करण्याची संधी दिली आहे. 31 मार्च पर्यंत कुणाचं न ऐकता, आत्महत्येचा विचार न करता पुढे यावं आणि एसटीत रुजू व्हावं. तसेच आपलं आपलं काम सुरू करावं. असे अजित पवार म्हणाले आहेत. मात्र त्यानंतर कठोर भूमिका घेतली जाईल असा इशाराही त्यांनी दिला.

अजित पवार म्हणाले की, एसटीचा प्रश्न सुटलेला आहे. अनिल परब यांनी काल समजूतदारपणे भूमिका घेतली. एसटी कामगारांना त्यांनी शेवटची संधी दिली आहे. एसटी कामगारांना जवळपास सातव्या वेतन आयोगाच्या जवळपास नेलं आहे. त्यांची पगारवाढ केली आहे. पूर्वी पेक्षा त्यात साडेसातशे कोटी रुपये वर्षाला वाढ झाली आहे. कामगारांना 10 तारखेपर्यंत पगार देण्याची जबाबादारीही सरकारने घेतली आहे. त्यामुळे कामगारांनी आता कामावर रूजू व्हावं.

एसटीचा संप हाताळण्यात सरकार अपयशी- अनिल परब

तीन महिन्यांहून अधिक काळ उलटूनही एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघाला नाही. या संपवार तोडगा काढण्यास सरकार अपयशी ठरल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी भर विधान परिषदेत मान्य केलं. परबांनी संप सुरु व्हायच्या आधीपासून ते आतापर्यंतचा पूर्ण घटनाक्रम सांगितला. एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांची मान्यता मिळावी या मागणीवर समितीने सर्वांचं ऐकून घेतले. या संपाचे नेतृत्व करणाऱ्या खोत आणि पडळकरांशी बोललो. तेव्हा त्यांनी पगारवाढीची मागणी केली.

आम्ही थेट पगारात पाच हजार वाढवून दिले. ज्यावेळी पगारात एवढी वाढ केली जाते तेव्हा पगार आठ हजारांनी वाढतो. एतिहासात एवढा पगार कधी वाढला नव्हता. तरीही कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम राहिले. यांच्या मागणीचा आम्ही अभ्यास करतो होतो. त्यानंतर पगार शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगाराजवळ नेऊन ठेवला. मात्र एवढे प्रयत्न करूनही शासनाला हे संप मिटवण्यात अपयश आले. असे म्हणत परबांनी पूर्ण हकीकत सांगितली.

Share This News

Related Post

महापारेषणचा ढिसाळ कारभार; PMRDA हद्दीतील उद्योगधंद्यांना मोठा फटका

Posted by - November 18, 2022 0
पिंपरी-चिंचवड : महापारेषणच्या ढिसाळ कारभाराचा फटका पीएमआरडीए हद्दीतील उद्योगधंद्यांना बसतो आहे. खंडीत विद्युत पुरवठा, विद्युत लाईन आणि उपकेंद्राच काम अतीशय…

पर्वती जनता वसाहतीमध्ये टोळक्याचा धुडगूस, कोयते नाचवत १२ हुन अधिक वाहनांची तोडफोड

Posted by - June 9, 2022 0
पुणे- स्वारगेटजवळ बुलेट गाडी फोडल्याच्या रागामधून निल्या वाडकर टोळीमधील गुंडांनी पर्वती पायथ्याला असलेल्या जनता वसाहतीमध्ये राडा करत १२ पेक्षा अधिक…

विधानपरिषद निवडणुकीचा पूर्ण निकाल ; वाचा सविस्तर कुणाला किती मतं मिळाली?

Posted by - June 20, 2022 0
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या विधान परिषद निवडणुकीचा निकाल अखेर लागला आहे. या निवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असे…
Hingoli News

Hingoli News : सर देवाचं घर कुठंय, मला नंबर द्या; शेतकऱ्याच्या लेकीचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Posted by - October 27, 2023 0
हिंगोली : हिंगोली (Hingoli News) जिल्ह्यातुन एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये एका शेतकऱ्याने नापीकी व कर्जबाजारीपणाला…

#ACCIDENT : रात्रीच्या जेवणानंतर शतपावलीसाठी बाहेर पडला; त्यानंतर तरुण घरी परतलाच नाही, कुटुंबावर शोककळा , नक्की काय घडले ?

Posted by - February 7, 2023 0
जळगाव : जळगाव मधून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. जळगाव मधील समता नगर या ठिकाणी राहणारा तरुण रमेश नाडे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *