पुण्यात 1 फेब्रुवारीपासून शाळा सुरू, अजित पवार यांची घोषणा, असे असतील नियम

151 0

पुणे- येत्या 1 फेब्रुवारीपासून पुण्यातील शाळा आणि महाविद्यालये सुरु होणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. शाळा सुरू करण्यासाठीची काय नियमावली असेल याची माहिती शाळांना देण्यात येणार आहे. आजच हे आदेश काढण्यात येणार असल्याची माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

अजित पवार यांनी सांगितले की, शाळा जरी सुरु होत असल्या तरी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणे बंधनकारक नसेल. पालकांनी याबाबत निर्णय घ्यायचा आहे. एकदा घडी नीट बसली की मग याबाबत पुढचा निर्णय घेण्यात येईल. पहिली ते आठवी वर्गाची शाळा अर्धा दिवस असेल. दुपारच्या सुट्टीनंतर मुलांनी घरी जाऊन डबा खायचा आहे. तर, नववी इयत्तेपासून पुढच्या इयत्तांचे वर्ग पूर्णवेळ भरतील. असे अजित पवार यांनी सांगितले.

तसेच नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचं लसीकरण करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांचं शाळेतच लसीकरण केलं जाणार आहे. याबाबतची माहिती शाळा चालक आणि संचालकांना देण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान 10 आणि 12 च्या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नसून याबाबतचा निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड घेतील अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

Share This News

Related Post

BIG BREAKING : राजीव गांधी हत्येतील दोषी पेरारीवलनची 31 वर्षांनंतर होणार सुटका – सुप्रीम कोर्ट

Posted by - November 11, 2022 0
नवी दिल्ली : राजीव गांधी हत्येतील दोषी ए.जी.पेरारीवलन याची ३१ वर्षांहून अधिक वर्षांची शिक्षा संपवून सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी तुरुंगातील त्याची…
Omraje

घातपात की अपघात? ओमराजे अपघातातून थोडक्यात बचावले

Posted by - June 10, 2023 0
धाराशिव : धाराशिवमधून (Dharashiva) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर टिप्परच्या धडकेतून थोडक्यात बचावले आहेत. भरधाव टिप्पर…
Punit Balan

“डॅगर परिवार स्कूल’’चा दुसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Posted by - November 3, 2023 0
पुणे : काश्मीरमधील बारामुल्ला भागात ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ आणि ‘चिनार कॉर्प्स’ यांच्यावतीने चालविण्यात येत असलेल्या विशेष मुलांच्या ‘‘डॅगर परिवार स्कूल’’…
Jalna Bribe

पिंपरी-चिंचवड मनपाच्या उद्यान विभागात एसीबीची धाड; उद्यान निरीक्षकाला लाच घेताना पकडले

Posted by - June 7, 2023 0
पिंपरी चिंचवड : मागील काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) महानगरपालिकेच्या विबिध विभागामध्ये लाचलुचपत विभागाने धाडी टाकून कर्मचाऱ्यांना लाच (Bribe)…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *