#AJIT PAWAR : रखरखत्या उन्हात 20 हजार आंदोलक शेतकरी मुंबईच्या वेशीवर; आंदोलक शेतकऱ्यांशी तातडीने चर्चा करुन सरकारने प्रश्न सोडवावेत

265 0

मुंबई : वनजमिनीच्या प्रमुख प्रलंबित प्रश्नासह शेतीमालाला हमीभाव, शेतीसाठी विज पुरवठा, शेती कर्ज माफी यासह अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा सेविका, शालेय पोषण आहार कर्मचारी, ग्रामपंचायत संगणक परिचालक, ग्रामरोजगार सेवक, पोलीस पाटील अशा जनतेशी निगडीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून घोषीत करुन शासन वेतनश्रेणी लागू करण्याच्या मागणीसाठी भारतीय किसान सभेच्यावतीने लाँगमार्च सुरु करण्यात आला आहे.

दिंडोरीहून आंदोलक शेतकरी रखरखत्या उन्हातून चालत मुंबईच्या वेशीवर आले आहेत. त्यांच्याबरोबरची मुख्यमंत्र्यांची बैठक रद्द करण्यात आली आहे, तरी सरकारने आंदोलक शेतकऱ्यांशी तातडीने चर्चा करुन त्यांचे प्रश्न सोडविण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, वनजमिनीच्या प्रमुख प्रलंबित प्रश्नासह शेतीमालाला हमीभाव, शेतीसाठी विज पुरवठा, शेती कर्ज माफी यासह अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा सेविका, शालेय पोषण आहार कर्मचारी, ग्रामपंचायत संगणक परिचालक, ग्रामरोजगार सेवक, पोलीस पाटील अशा जनतेशी निगडीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून घोषीत करुन शासन वेतनश्रेणी लागू करण्याच्या मागणीसाठी भारतीय किसान सभेच्यावतीने लाँगमार्च सुरु करण्यात आला आहे.

रविवार (दि. 12 मार्च) पासून दिंडोरी (जि.नाशिक) येथून त्याची सुरवात झाली आहे. या लाँगमार्चमध्ये वीस ते पंचवीस हजार आंदोलक शेतकरी सहभागी झाले आहेत. आंदोलक मुंबईच्या वेशीवर दाखल झाले आहेत. तरी सरकारने या आंदोलकांच्या आंदोलनाची तातडीने दखल घेऊन त्यांचे प्रश्न सोडविण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

Share This News

Related Post

divorce

असाही एक घटस्फोट, पत्नीने सोडला पोटगीचा हक्क आणि….

Posted by - May 8, 2023 0
पुणे : आजकाल घटस्फोट (Divorce) झाला कि पतीला आपल्या पत्नीला पोटगी (Alimony) द्यावी लागते. मात्र कधी पत्नीने घटस्फोटादरम्यान आपल्या पत्नीला…

#HEALTH WEALTH : तुम्हीही उपाशी पोटी चहा पिता का ? मग चहाचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम वाचाचं

Posted by - March 1, 2023 0
#HEALTH WEALTH : भारतात चहा पिणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. यासाठीचा चहा देशभरात लोकप्रिय आहे. लोक आपल्या दिवसाची सुरुवात चहाने…

घरगुती सिलेंडरचा काळाबाजार करणारे गजाआड, पुण्यात वडगाव बुद्रुकमध्ये कारवाई

Posted by - March 31, 2023 0
घरगुती वापराच्या सिलिंडरमधील गॅस व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरून काळाबाजार करण्याचा प्रकार पुण्यात सुरु होता. हा प्रकार गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने…

कोरोनाची तिसरी लाट ओसरत आहे, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3.4 टक्के कमी रुग्ण

Posted by - February 2, 2022 0
नवी दिल्ली- देशात कोरोनाची तिसरी लाट ओसरत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मागील 24 तासांत कोरोना विषाणूचे एक लाख 61…

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा विसर पडल्याचे दिसले – चंद्रकांत पाटील

Posted by - May 14, 2022 0
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी मुंबईतील सभेत भाषण करताना राज्याच्या विकासाच्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलायचे विसरले. स्वतः पेट्रोल डिझेलची महागाई…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *