अजित डोभाल यांच्या घरात घुसला अज्ञात व्यक्ती, रिमोटनं कंट्रोल केलं जात असल्याचा दावा

205 0

नवी दिल्ली – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या घरात एकानं घुसण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सुरक्षारक्षकांनी तातडीनं घरात घुसणाऱ्या अज्ञात व्यक्तीला तातडीनं ताब्यात घेतलं आहे. सध्या दिल्ली पोलिसांकडून त्या व्यक्तीची चौकशी सुरु आहे. नेमका हा व्यक्ती कोण आहे ? त्यानं नेमकं असं का केलं, याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही.

दिल्लीतील लोधी कॉलनीत असलेल्या स्पेशल सेलच्या ऑफिसात या व्यक्तीची कसून चौकशी सुरु आहे. आपल्याला रिमोटनं कंट्रोल केलं जात असल्याचा दावा केला असून आपल्यावर चीप लावण्यात आली असल्याचंही या इसमानं म्हटलं. त्याची तपासणी केली. त्यानंतर कोणत्याही प्रकारची चीप या व्यक्तीच्या शरीरावर आढळून आली नाही. ही व्यक्ती कर्नाटकच्या बंगळुरुतील राहाणारा असल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे.

कोण आहेत अजित डोभाल ?

अजित डोभाल हे 1972 सालचे आयबी अधिकारी आहेत. भारतीय गुप्तहेर म्हणून त्यांनी अनेक बड्या कारवाया केल्या आहेत. सात वर्ष ते पाकिस्तानमध्ये राहिले आहे. ऑपरेशन ब्लू स्टार, ऑपरेशन ब्लू थंडर यात अजित डोभाल यांची महत्त्वाची भूमिका होती. 1999 साली झालेल्या विमान अपहरणावेळी अजित डोभाल यांना सरकारच्या वतीनं मुख्य वार्ताहर बनवण्यात आले होते.

Share This News

Related Post

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक ; दुसऱ्या फेरीअखेर काँग्रेसच्या जयश्री जाधव आघाडीवर

Posted by - April 16, 2022 0
गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या उत्तर कोल्हापूर पोटनिवडणुकीची…

नवी मुंबईत शिवसेनेच्या माजी नगरसेविकेची शिवसेना विभाग प्रमुखाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

Posted by - April 4, 2022 0
नवी मुंबई – शिवसेनेच्या माजी नगरसेविकेने व त्यांच्या समर्थकांनी शिवसेनेच्याच विभाग प्रमुखाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. नवी…

MAHARASHTRA POLITICS : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबत दाखल सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी 13 जानेवारीला

Posted by - December 13, 2022 0
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षातील दाखल सर्व याचिकांवर येत्या 13 जानेवारीला एकत्रित सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी…

शेतकऱ्यांना दिलासा! कांदा लिलाव बंदचा निर्णय अखेर मागे

Posted by - October 2, 2023 0
नाशिक शहरातून एक मोठी बातमी समोर आली असून कांदा लिलाव बंदचा निर्णय अखेर मागे घेण्यात आला आहे उद्यापासूनच कांद्याचे लिलाव…
PM Kisan

PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी जमा होणार PM किसानचा 17वा हप्ता

Posted by - June 12, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शेतकऱ्यांसाठी मोठी आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीचा (PM Kisan…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *