बेळगावात वाहनांवर झालेल्या हल्ल्यानंतर महाराष्ट्रात वादळाची ठिणगी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक मुख्यमंत्री यांना केला फोन, म्हणाले….

421 0

बेळगाव : बेळगावच्या हिरेबागवाडी येथे टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या वाहनांनवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेने हल्ला केला आहे. यावेळी कर्नाटकमध्ये ही वाहने येऊ देणार नाही, यासाठी वाहनांच्या समोर काही संघटनेचे लोक अक्षरशः झोपले तर वाहनांवर दगडफेक देखील करण्यात आली असल्याचे समजते. बऱ्याच दिवसापासून कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद सुरू आहे. पण या हल्ल्यानंतर आता वादाची पहिली ठिणगी पडली आहे.

या हल्ल्यानंतर महाराष्ट्रभर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून ठाकरे गटाने देखील आता आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर इचलकरंजीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केल आहे. कर्नाटक महाराष्ट्राची गाडी पुढे येऊ देणार नसेल तर कर्नाटकची एकही गाडी महाराष्ट्रात फिरू देणार नाही, अशी भूमिका मनसेने घेतली आहे.

दरम्यान एसटी महामंडळाने देखील जर कर्नाटक प्रशासन किंवा आंदोलन ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाकडून राज्याची सीमा ओलांडू दिली नाही तर महाराष्ट्रातून कर्नाटककडे जाणाऱ्या बस देखील थांबवल्या जातील, एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी हा निर्णय घेतला आहे.

एकंदरीत वाद चिघळत असल्याचे पाहता आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि कर्नाटकचे पोलीस सीमेवर तैनात करण्यात आले आहेत.

दरम्यान या हल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी महाराष्ट्राच्या वाहनांना संरक्षण देणार असल्याची माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज मुंबई यांनी दिली आहे.

Share This News

Related Post

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यास भाजप बरोबर जाणार का ? या प्रश्नावर शरद पवार म्हणाले..

Posted by - June 21, 2022 0
नवी दिल्ली- शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांना घेऊन बंड पुकारले आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास…
Raj Thackeray

Raj Thackeray : भाजपच्या बैठकीदरम्यान राज ठाकरे तातडीने दिल्लीला रवाना

Posted by - March 18, 2024 0
मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही काळापासून मनसे आणि भाजप युतीची चर्चा सुरु आहे.…
SANJAY RAUT

#MAHARASHTRA POLITICS : संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंग कारवाई होणार ? उद्या महत्त्वाची बैठक

Posted by - March 8, 2023 0
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला आहे. नऊ तारखेला उद्या याबाबत हक्कभंग…
Nashik Crime

Nashik Crime : खळबळजनक ! नाशिकमधील चांदवडच्या तरुणाची दिंडोरीतील पालखेड धरणाजवळ हत्या

Posted by - November 23, 2023 0
नाशिक : नाशिकमधून (Nashik Crime) एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात असलेल्या लोखंडेवाडी, शिवारातील पालखेड धरणाच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *