NIA

पुण्यानंतर आता महाराष्ट्रातील ‘या’ महत्त्वाच्या शहरांमधून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना अटक

400 0

महाराष्ट्र : राष्ट्रीय तपास संस्थेने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या विरोधात जोरदार कारवाईचा बडगा उगारला आहे. दरम्यान नाशिक आणि पुण्यातील PFI च्या संशयित कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर आता महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये देखील जोरदार कारवाई सुरू केली आहे. महाराष्ट्रातील औरंगाबाद ,ठाणे सोलापूर ,नांदेड ,जालना आणि परभणी या शहरांमध्ये राष्ट्रीय तपास संस्थेने धडक कारवाई सुरू केली आहे .

या छापेमारीमध्ये PFI च्या संशयित कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान राष्ट्रीय तपास संस्था आणि एटीएस त्यासह गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या पथकाने हे छापे टाकले आहेत. सोलापुरातून एका संशयताला अटक करण्यात आली आहे. तर औरंगाबाद शहरातून 14 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. त्यासह ठाण्यातून एक संशयित ताब्यात घेण्यात आलय. या सर्वांना लवकरच न्यायालयात हजर करण्यात येईल.

राष्ट्रीय तपास संस्थेने आतापर्यंत आठ राज्यांमध्ये 25 हून अधिक ठिकाणी छापेमारी केली आहे. राष्ट्रीय तपास संस्था, इडी आणि एटीएसने आत्तापर्यंत 95 ठिकाणी छापे टाकून 106 PFI च्या कार्यकर्त्यांना अटक केली.

Share This News

Related Post

पुण्यात १३ वर्षाच्या विद्यार्थिनीवर बलात्कार, शाळेच्या बाथरूममध्ये केले घृणास्पद कृत्य

Posted by - March 24, 2022 0
पुणे- पुण्यात एका १३ वर्षाच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ओळख असल्याचा बहाणा करून एका अज्ञात व्यक्तीने…
Yavatmal News

Yavatmal News : धक्कादायक ! विजेचा शॉक लागून विद्यूत कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - November 18, 2023 0
यवतमाळ : यवतमाळमधून (Yavatmal News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्याच्या काळी दौलत खान या ठिकाणी…

भाजपने संसदीय समितीतून नितीन गडकरींचे नाव वगळले ; महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘या’ समितीत एन्ट्री

Posted by - August 17, 2022 0
नवी दिल्ली : भाजपने संसदीय समिती आणि निवडणूक प्रचार समिती जाहीर केली . ही संसदीय समिती एकूण 11 सदस्यांची असणार…
MS Swaminathan

MS Swaminathan : भारताच्या हरित क्रांतीचे जनक एमएस स्वामीनाथन यांचे निधन

Posted by - September 28, 2023 0
चेन्नई : भारताच्या हरित क्रांतीचे जनक एमएस स्वामीनाथन (MS Swaminathan) यांचे चेन्नई येथे आज निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 98…

खुनाचा प्रयत्न करून दोन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या तिघा सराईतांना अटक

Posted by - May 10, 2022 0
पुणे- खुनाचा प्रयत्न करून दोन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत फरार असणाऱ्या तिघा सराईत गुन्हेगारांना शिवाजीनगर पोलिसांनी शिताफीने अटक केली.  रणजित…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *