अन्न व औषध प्रशासनातर्फे दौंड तालुक्यात गुळ उत्पादकावर कारवाई ; 324 किलो भेसळयुक्त गूळ जप्त

347 0

पुणे : अन्न व औषध प्रशासनाने काल (बुधवारी) दौंड तालुक्यातील बोरीपार्धी येथील मे. महाराज गूळ उद्योग उत्पादकाच्या गुऱ्हाळ घरावर छापा टाकून २८ हजार ८०० रुपये किंमतीचा सुमारे ३२४ किलो भेसळयुक्त गूळ तर २२ हजार १०० रुपये किंमतीची ६५० किलो भेसळयुक्त साखर जप्त केली.

अन्न व औषध प्रशासनातर्फे भेसळयुक्त गूळ व साखर वापरणाऱ्या गूळ उत्पादकावर  कारवाई करताना या प्रकरणी घेण्यात आलेले दोन्ही नमुने विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. तपासणीमध्ये आढळून आलेल्या त्रुटीच्या अनुषंगाने विक्रेत्यास २० हजार रुपये तडजोड शुल्क इतका दंड आकारण्यात आला आहे.

याबाबत प्रशासनास मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत असल्याने प्रशासनामार्फत लवकरच विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. याप्रकरणी गैरप्रकार आढळून येणाऱ्या गुऱ्हाळ घरावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व गुऱ्हाळ चालकांनी अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ या कायद्याअंतर्गत आवश्यक असलेला परवाना प्राप्त करुनच गूळ उत्पादन करावे. याबाबतीत माहिती असल्यास प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकवर संपर्क साधण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सहायक आयुक्त संजय नारागुडे यांनी केले आहे.

Share This News

Related Post

Chhagan Bhujbal and manoj Jarange

Chhagan Bhujbal : छगन भुजबळांना मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून… मनोज जरांगेचा मोठा आरोप

Posted by - November 18, 2023 0
सातारा : मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्याचा आज 4 था दिवस आहे. आज ते साताऱ्यात आहेत. यावेळी त्यांनी इस्लामपूर येथील…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभियंता दिनाच्या शुभेच्छा ; आधुनिक भारताच्या उभारणीत अभियंत्यांचे महत्वपूर्ण योगदान

Posted by - September 15, 2022 0
मुंबई : राष्ट्रीय अभियंता दिनाच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभियंत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच ज्यांच्या जयंतीनिमित्त हा दिन साजरा करण्यात…

BOLLYWOOD : कतरीना कैफला सोशल मीडियावर स्टॉक करणाऱ्या माथेफिरूच्या विरुद्ध विकीची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार ; विकीला दिली जीवे मारण्याची धमकी

Posted by - July 25, 2022 0
मुंबई : बॉलीवूड जगतातील विशेष करून अभिनेत्रींना त्यांच्या फॅन्स कडून अनेक वेळा विक्षिप्त अशा कमेंट्स येत असतात. त्यांच्या सोशल मीडिया…
Death

Crime News : संपूर्ण गाव हादरलं ! पत्नीने केलेली भाजी आवडली नाही म्हणून पतीने संतापाच्या भरात उचलले ‘हे’ पाऊल

Posted by - August 15, 2023 0
लखनऊ : एखादी व्यक्ती रागाच्या भरात काय करेल (Crime News) आणि काय नाही याचा काही सांगता येत नाही. अशीच एक…

लाल परीची दिवाळी जोरदार ! 275 कोटींचे उत्पन्न

Posted by - November 3, 2022 0
महाराष्ट्र : कोरोना काळामध्ये सर्वच क्षेत्रांना जबरदस्त आर्थिक फटका बसला होता. लॉकडाऊनमुळे लाल परीला देखील याचा मोठा फटका बसला. पण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *