विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाला पिकअपची धडक, चालकासह १० विद्यार्थी जखमी

158 0

पुणे- विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाला भरधाव पिकअपने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात चालकासह १० विद्यार्थी जखमी झाले. हा अपघात पुणे सोलापूर महामार्गावर उरळीकांचन येथे आज, सोमवारी सकाळी १० वाजता घडला.

बोरीभडक (ता. दौंड ) येथून ही रिक्षा उरळीकांचनच्या शाळेत विद्यार्थ्यांना घेऊन जात होती. संदीप कोळपे असे रिक्षाचालकाने नाव आहे. तर अंकुश येलभारे, मानसी कोळपे, भक्ती शिंदे, वैष्णवी गव्हाणे, तनुजा कोळपे, मयुरी शिंदे, अमर शिंदे, हर्षल वाघमारे (सर्व रा. बोरीभडक (ता. दौंड ) अशी जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. ९ विद्यार्थी हे महात्मा गांधी महाविद्यालयातील तर एक विद्यार्थिनी स्वामी विवेकानंद विद्यालयात इयत्ता आठवीत शिकत आहे.

जखमी विद्यार्थ्यांवर उरळीकांचन येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सर्व विद्यार्थी सुखरूप असून एका विद्यार्थ्यांचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे.

Share This News

Related Post

#PUNE : …तर चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूक रद्द होऊ शकते; कायदे तज्ञ असीम सरोदे यांनी सांगितले ‘हे’ कारण !

Posted by - February 9, 2023 0
पुणे : सध्या पुण्यामध्ये कसबा आणि चिंचवड पोट निवडणुकीचे वारे वाहते आहे. पण अशातच कायदे तज्ञ असीम सरोदे यांनी एक…
Maratha Reservation

Maratha Reservation : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात गोंधळ; मराठा आंदोलकांनी दाखवले काळे झेंडे

Posted by - October 30, 2023 0
यवतमाळ : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण तापलं आहे. मराठा आंदोलक आता आक्रमक होताना दिसत आहेत. मराठा आंदोलकांनी…

एसटी विलिनीकरणासंदर्भातला अहवाल सरकारकडून कोर्टात सादर, सुनावणी 22 फेब्रुवारीला

Posted by - February 12, 2022 0
मुंबई- एसटी विलिनीकरणासंदर्भातला उच्चस्तरीय समितीचा अहवाल कालच राज्य सरकारनं उच्च न्यायालयात सादर केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आता या अहवालासंदर्भात…

पोट धरून हसाल : लिंबूच मटन , धनंजय माने इथेच राहतात का ? हे डायलॉग कधीही न विसरणारे , पण यातला एक डायलॉग घेताना मामांकडून झाली होती ‘ही’ चूक तरीही ठरला सुपरहिट

Posted by - September 26, 2022 0
अशी ही बनवाबनवी यातले डायलॉगच काय , या चित्रपटाचं नाव जरी आज कुणी घेतलं तर एक नकळत हसू चेहऱ्यावर उमटून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *