नाही..नाही..म्हणता ..म्हणता..! अब्दुल सत्तारांच्या गळ्यात पडली मंत्रिपदाची माळ, ‘या’ कारणाने शिंदे-भाजप सरकारकडून अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद?

278 0

मुंबई : शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यातील TET SCAM  मधील संबंध उघड झाल्यानंतर अब्दुल सत्तार यांच्या मंत्रिपदावर हात आया मुह ना लगा …! अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अब्दुल सत्तार यांना आता मंत्रिपद मिळणं एकीकडे अशक्य असे वाटत असतानाच आज मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अब्दुल सत्तार यांच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

टीईटी परीक्षेमध्ये 2019 मध्ये गैरव्यवहार झाल्याचे उघड झालं .या गैरव्यवहारातून 7,800 अपात्र उमेदवारांना देखील पात्र ठरवण्यात आलं होतं . बोगस प्रमाणपत्र वाटण्यात आल्याचं चौकशीमध्ये उघड झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना आता परीक्षा बंदी करण्यात आली आहे. त्याचबरोबर नोकरीचे पद देखील रद्द करण्यात आलं .धक्कादायक म्हणजे या संपूर्ण प्रकरणांमध्ये जेव्हा आमदार अब्दुल सत्तार यांचा संबंध उघड झाला ,आणि त्यांच्या दोन्ही मुलींची नावे देखील निष्पन्न झाली ,त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान अब्दुल सत्तार यांचं मंत्रीपद आता अशक्य असल्याचं बोललं जात असतानाच शिंदेंच्या कॅबिनेटमध्ये सत्तार यांची देखील वर्णी लागली आहे. दरम्यान शिंदे-भाजप सरकारकडून एकमेव मुस्लिम आमदार असलेले अब्दुल सत्तार यांना संधी देणं राजकीय दृष्ट्या महत्त्वाचं असल्याकारणानेच शिंदे भाजप सरकारने अब्दुल सत्तार यांची मंत्रिपदी वर्णी लावली असल्याचं बोललं जात आहे.

Share This News

Related Post

पंतप्रधानांच्या पुणे दौरा पार्श्वभूमीवर काळे कपडे घालून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

Posted by - March 6, 2022 0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन होणार आहे. मात्र, पंतप्रधानांच्या या दौऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेसने…

मनसे लोकसभा निवडणूक लढवणार; या नावांवर झालं शिक्कामोर्तब?

Posted by - October 7, 2023 0
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसले असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा लोकसभेच्या मैदानात उतरणार आहे. मनसेकडून पुणे ठाणे व…

पुणे : आमदार मुक्ता टिळक यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Posted by - December 23, 2022 0
पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शासनाच्यावतीने पालकमंत्री चंद्रकांतदादा…

एनडीएच्या परीक्षेत हजार मुली उत्तीर्ण

Posted by - March 3, 2022 0
लष्कराच्या तिन्ही दलांना दर्जेदार अधिकारी पुरविणाऱ्या पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या प्रवेश प्रक्रिये अंतर्गत(एनडीए) सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या मुलाखती मार्च – एप्रिल…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *