आम आदमी पार्टीचा दणका : आपच्या टीकेनंतर कर्वे पुतळा येथील चंद्रकांत पाटील यांचा फ्लेक्स रातोरात भाजपने हटवला

761 0

पुणे : भारतीय जनता पार्टी ही आमदार चंद्रकांत पाटील यांना भारतरत्न महर्षी कर्वे यांच्यापेक्षा मोठे समजते का ? आमदार चंद्रकांत पाटील आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर कर्वे पुतळा परिसरात भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांचा कर्वे पुतळ्या शेजारी पुतळ्या पेक्षाही भला मोठा, उंच फ्लेक्स उभारला गेला होता. काल यावर आपचे प्रवक्ते डॉ अभिजीत मोरे यांनी सडकून टीका केली होती.

फ्लेक्सबाजी सोडून पुणेकरांसाठी विशेष काहीही न केलेले भाजपचे नेते पुणेकरांनी सहन केल्याने, त्यांना वेळीच प्रतिकार न केल्याने आता सवंग प्रसिध्दीच्या नादात त्यांची मजल महापुरुषांच्या अवहेलना, अपमानापर्यंत गेली. हे अत्यंत निषेधार्ह आहे.

महर्षी कर्वेंच्या पुतळ्याशेजारील चंद्रकांत पाटील यांचा पुतळ्यापेक्षाही भला मोठा, उंच फ्लेक्स आम आदमी पक्षाच्या टीकेनंतर भाजपने रातोरात हटवला.

काल कर्वे पुतळा येथे आपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करुन निषेध व्यक्त केला होता. यामध्ये आपचे डॉ अभिजीत मोरे, प्रा सुहास पवार, सुशील बोबडे, निलेश वांजळे, प्रा बाबासाहेब जाधव, किशोर मुजुमदार, सुरेखा भोसले, विद्यानंद नायक, किरण कांबळे, फेबियन समसन, शेखर ढगे, रवी लाटे, आबासाहेब कांबळे, सीमा गुट्टे, रामभाऊ इंगळे, अंजली इंगळे, ऋषिकेश मारणे, शिवाजी डोलारे, संजय कटारनवरे, साहिल जवळेकर, यादव, संतोष सांबरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला.

Share This News

Related Post

महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारींची उचलबांगडी करा ! – नाना पटोले

Posted by - July 30, 2022 0
मुंबई:राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबदद्ल अनावश्यक वक्तव्य करून मुंबई व महाराष्ट्राचा अपमान केला आहे. मुंबई उभारण्यात मराठी माणसाचेच योगदान सर्वात…

अखेर चांदणी चौकातील पूल इतिहासजमा

Posted by - October 2, 2022 0
पुणे: मुंबई-बंगळुरू महामार्गावरील चांदणी चौकातील जुना पूल मध्यरात्री एक वाजून एक मिनिटांनी पाडण्यासाठी ६०० किलो  स्फोटकांच्या माध्यमातून पूल प्रयत्न केला…

ऐकावे ते नवलचं ! काजूकतली फुकट दिली नाही म्हणून दुकानदारावर रोखली बंदूक, गोळी थेट…

Posted by - December 21, 2022 0
पुणे : पुण्यातील सिंहगड रोडवर एक अजब घटना घडली आहे. खरंतर या प्रकरणातील अवघ्या 23 वर्षीय आरोपीकडे गावठी कट्टा असणे…

मोठी बातमी : कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद प्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करणार मध्यस्थी; 14 डिसेंबरला होणार महत्त्वाची चर्चा

Posted by - December 9, 2022 0
नवी दिल्ली : सध्या महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रश्न मोठ्या प्रमाणावर चिघळल्याने महाराष्ट्रातील खासदारांनी आज सकाळी अमित शहा यांची भेट घेतली.…

विधानसभा निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडी ठरली होती; शिंदे गटातील नेत्याचं खबळबळजनक विधान

Posted by - December 25, 2022 0
पुणे: राज्यात अभूतपूर्व सत्तांतर होऊन आता तीन महिने लोटल्यानंतर शिंदे गटातील एका नेत्याचा विधान चांगलंच चर्चेत आलं असून या विधानामुळे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *