#PUNE : कसबा विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पार्टीचे किरण कद्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

615 0

पुणे : आम आदमी पार्टीने उच्च शिक्षित, जनसामान्यात वावरणाऱ्या, कसबा विधासभेत ३० वर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन आर्धी लढाई जिंकली आहे. उमेदवारीचा अर्ज भरता वेळेस राज्य संघटक विजय कुंभार, मुकुंद किर्दत, अभिजित मोरे, एकनाथ ढोले, सौ. विजया किरण कद्रे आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर किरण कद्रे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. “आम आदमी चे अरविंद केजरीवाल यांनी जे काम जनसामान्यांसाठी काम केले आहे तसेच काम कसबा मतदार संघात केले जाईल असे सांगितले”.

विजय कुंभार “देशाचे मालक ही जनताच आहे, हेच आमच्या आमदारांच्या कामातून दिसेल. आम्ही पूर्ण ताकतिने प्रचार करणार आहोत, विजय आमचाच निश्चित आहे.”

उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर सर्व कार्यकर्त्यांनी पुणे पालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले.

Share This News

Related Post

रामोशी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करणार -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted by - September 7, 2022 0
पुणे :  रामोशी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

नॅशनल हेरॉल्ड प्रकरण : मल्लिकार्जुन खर्गे यांची ईडीकडून चौकशी

Posted by - April 11, 2022 0
नवी दिल्ली- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून चौकशी होणार आहे. भ्रष्टाचार प्रकरणी ही चौकशी होणार…
Devendra Fadanvis

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांना जपानकडून मानद डॉक्टरेट पदवी जाहीर

Posted by - August 22, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जपानमधील कोयासन विद्यापीठाने मानद डॉक्टरेट (Devendra Fadnavis) जाहीर…

चुकीचा निर्णय दिल्याचा आरोप करून महाराष्ट्र केसरीतील पंच मारुती सातव यांना धमकीचे फोन; कोथरूड पोलीस स्थानकात तक्रार दाखल

Posted by - January 16, 2023 0
पुणे : 10 ते 14 जानेवारी दरम्यान पुण्यात 65 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेनंतर एक मोठी बातमी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *