#PUNE : नवले पुलावरून 50 फूट उंचीवरून तरुणीची उडी ! प्रेम प्रकरणातून उचलले टोकाचे पाऊल, पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेने असे वाचले प्राण…

536 0

पुणे : रविवारी पुण्यामध्ये एक विचित्र घटना घडली आहे. एका 24 वर्षाच्या तरुणीने नवले पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवानं पोलीस आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे या महिलेला वाचवण्यात यश आल आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास या महिलेने नवले पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नवले पुलाची उंची ही पन्नास फुटाची आहे ज्या ठिकाणावरून या महिलेने उडी मारली असल्याचे समजते. उडी मारण्यापूर्वी ही महिला जोरजोरात ओरडत होती.

घटनेचा गांभीर्य लक्षात घेऊन नवले पुलाखाली वाहतूक नियमन करणारे वाहतूक पोलीस अंमलदार मिथुन राठोड ,अमर कोरडे आणि स्थानिक नागरिक राजू जगताप ,सागर बर्दापुरे ,प्रदीप जोरे ,श्रेयस तांबे यांनी जवळच्या हॉटेलमधून एक सतरंजी आणून खाली धरली आणि काही जणांनी पुलावर या महिलेला रोखण्यासाठी म्हणून धाव घेतली होती. परंतु तोपर्यंत या महिलेने पुलावरून थेट खाली उडी मारली. या सतरंजीमध्ये कसेबसे तिला पकडले गेले. यामध्ये या महिलेला किरकोळ दुखापत झाली आहे. परंतु तिचे प्राण वाचले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रेम प्रकरणातून या महिलेने असं टोकाचे पाऊल उचललं. अद्याप सविस्तर माहिती मिळाली नाही. परंतु तिचं मानसिक संतुलन बिघडल्यामुळे तिने थेट पुलावरून 50 फूट उंचीवरून खाली उडी मारली असल्याचे समजते. परंतु सतर्क पोलीस आणि नागरिकांमुळे तिथे प्राण वाचवले आहेत.

Share This News

Related Post

Pimpari - Chinchwad

Pimpari – Chinchwad : धक्कादायक! भर पावसात रस्त्यावर आढळले 2 दिवसांचं अर्भक; पिपंरी-चिंचवडमध्ये उडाली खळबळ

Posted by - July 22, 2023 0
पिंपरी-चिंचवड : पिंपरी -चिंचवडमधून (Pimpari – Chinchwad) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या शहरात (Pimpari – Chinchwad) असलेल्या मरकळगावमधील…

औरंगाबाद हादरले ! एकतर्फी प्रेमातून १९ वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने भोसकून हत्या

Posted by - May 21, 2022 0
औरंगाबाद- औरंगाबाद शहरात एकतर्फी प्रेमातून एका १९ वर्षीय कॉलेज युवतीची भरदिवसा हत्या झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कॉलेजजवळून तिला…

” शिवसेनेचे जिंकणे हे आता स्वप्नच बनून राहणार , त्यामुळे आता दौरे करून काय मिळणार ?” गिरीश महाजनांची आदित्य ठाकरेंवर टीका

Posted by - August 29, 2022 0
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मोठी उलथा पालथ झाली. दरम्यान पक्षाला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी आणि…

पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला, संभाजीनगरमधील वेताळवाडी किल्ल्यावरील घटना

Posted by - April 10, 2023 0
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात अजिंठ्याच्या डोंगर रांगेत असलेल्या वेताळवाडी किल्ल्यावर आलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी जीवघेणा हल्ला केला. यामध्ये तीनजण गंभीर…
Solapur Crime

Solapur Crime : शतपावलीसाठी गेलेल्या API ची निर्घृणपणे हत्या; पोलीस दलात उडाली खळबळ

Posted by - August 3, 2023 0
सोलापूर : सोलापुरमध्ये (Solapur Crime) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे सोलापूर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये सोलापुरातील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *