मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातीचे दाखले शाळेतच देण्याबाबत विशेष मोहिमेचे आयोजन

119 0

पुणे : सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे कार्यालयातर्फे ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ कालावधीत मागासवर्गीय प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना जातीचे दाखले शाळेतच उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, शासकीय वसतिगृहे, शासकीय निवासी शाळा, अनुसूचित जातीच्या मुला-मुलींसाठी निवासी शाळा तसेच विमुक्त जाती भटक्या जमातीच्या आश्रमशाळातील अनुसूचित जाती, अनसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास वर्ग या प्रवर्गाच्या मागासवर्गीय विद्यार्थ्याचे जातीचे दाखले शाळेमध्येच त्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

सेवा पंधरवडा कालावधीत या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त संगिता डावखर यांनी केले आहे.

Share This News

Related Post

#Fire Insurance : उन्हाळ्याचे दिवस आले की अग्निविमा का गरजेचा ? वाचा सविस्तर माहिती

Posted by - February 24, 2023 0
उन्हाळ्याचे दिवस आले की आगीच्या घटना वाढतात, असे मागील काही वर्षांत दिसून आले आहे. अर्थात, आगीची घटना कधीही आणि केव्हाही…

सिंहगडाचा श्वास मोकळा : किल्ले सिंहगडावर पुणे विभागाची अतिक्रमण निर्मूलन कारवाई

Posted by - November 18, 2022 0
पुणे : शुक्रवारी पहाटेपासून किल्ले सिंहगडावर पुणे वनविभागाने अतिक्रमण निर्मूलन कारवाईला सुरुवात केली आहे.  सिंहगडाचे ऐतिहासिक महत्त्व तसेच गडाचे सौंदर्य…

#HSC : महाराष्ट्र स्टेट बोर्ड परीक्षा 2023 देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ; हॉल तिकीट्स आज पासून उपलब्ध होणार !

Posted by - January 27, 2023 0
पुणे : महाराष्ट्र स्टेट बोर्ड परीक्षा 2023 देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी…
Pune Police

Pune News: कौतुकास्पद ! पुणे पोलिसांच्या जवानांकडून ‘मोस्ट वॉन्टेड’ दहशतवाद्यांना अटक

Posted by - July 19, 2023 0
पुणे : एनआयएकडून 5 लाखांचे बक्षीस असणाऱ्या दोन “मोस्ट वॉन्टेड” दहशतवाद्यांना पुण्याच्या कोथरूड भागातून पुणे पोलिसांच्या 2 जवानांनी पकडले आहे.…

पुणे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या दबावापुढे MIT-WPU युनिव्हर्सिटी प्रशासन झुकले; मागण्या मान्य

Posted by - November 10, 2022 0
पुणे : MIT-WPU युनिव्हर्सिटी येथे ज्या विद्यार्थ्यांनी लेट फिस भरली होती. अशा विद्यार्थ्यांवर युनिव्हर्सिटी प्रशासनाने 10 टक्के पेनल्टी व दिवसाला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *