पुणेकरांसाठी उपयुक्त माहिती : पुणे महापालिकेच्या 80 सेवा आता व्हॉट्सॲपवर ; व्हॉट्सॲपवर सेवा देणारी देशातील पुणे पहिली महापालिका

703 0

पुणे : नागरिकांशी संवाद साधणं सोपं व्हावं यासाठी पुणे महापालिकेने सुरू केलेल्या व्हॉट्सॲप बॉट अर्थात माहिती देणाऱ्या स्वयंचलित यंत्रणा प्रणालीवर 80 प्रकारच्या सेवा आता उपलब्ध झाल्या आहेत. अशा प्रकारे नागरिकांना व्हॉट्सॲपवर सेवा देणारी पुणे ही देशातील पहिलीच महापालिका असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.

महापालिकेच्या विविध विभागांमार्फत नागरिकांना अनेक सेवा सुविधा दिल्या जातात. यासाठी नागरिकांना महापालिका भवन किंवा क्षेत्रीय कार्यालयात जावं लागतं. मात्र ई गव्हर्नन्स सुरू झाल्यानंतर महापालिकेने विविध सेवा ऑनलाइन पध्दतीने सुरू केल्या आहेत. महापालिकेशी संबंधित असलेल्या सेवा सुविधा नागरिकांना एका क्लिकवर मिळाव्यात यासाठी महापालिकेने व्हॉट्सॲप चॅटबॉट प्रणाली विकसित केली आहे. यासाठी महापालिकेने 8888251001 हा विशेष नंबर जारी केला आहे. हा नंबर मोबाइलमध्ये सेव्ह करून ‘हाय’ असा शब्द टाइप केल्यानंतर पुढील संवाद सुरू होतो. सुरुवातीला या प्रणालीद्वारे मिळकतकर भरणा आणि पाणीपट्टी या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या प्रणाली अंतर्गत कोणकोणत्या सुविधा आहेत ते पाहूयात

जन्म-मृत्यू नोंदणी व दाखले, पाळीव प्राण्यांची नोंदणी, बांधकाम प्रस्ताव दाखल करणे, आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांसह खातेप्रमुखांचे नंबर, विविध विभागांची माहिती, दैनंदिन निगडित गरजांसोबत तक्रार नोंदणी, विविध प्रकारचे मिळकत कर, पाणीपट्टी बिल, फेरीवाला देयक, जाहिरात फलकाची बिलं यांचा भरणा करणं, कुत्रा पाळण्याचा परवाना, फांद्या छाटणी परवानगी, झाड तोडणे परवानगी, जाहिरात फलक परवाना, नवीन नळजोडणी अर्ज, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, मिळकत कर ना हरकत प्रमाणपत्र, मिळकत हस्तांतरण, वारसाहक्क हस्तांतरण, तक्रार दाखल व तक्रारीची सद्यस्थिती पाहणे, शहरी गरीब आरोग्य योजना, पंडित दीनदयाळ अपघात विमा योजना, पंतप्रधान आवास योजना, प्राणी दत्तक, खेळाडू दत्तक, मागासवर्गीय कल्याणकारी योजना, अपंग कल्याणकारी योजना, महिला सक्षमीकरण योजना, युवक कल्याणकारी योजना

Share This News

Related Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 मार्च रोजी पुणे दौऱ्यावर, मेट्रो मार्गाचे होणार उदघाटन

Posted by - February 19, 2022 0
पुणे- पुणे महापालिका निवडणुकीपूर्वी शहरातील महत्वाच्या प्रकल्पाचे उदघाटन आणि भूमिपूजन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ मार्च रोजी पुणे दौऱ्यावर येत…

बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेना आक्रमक ! शिवसेनेने घेतला मोठा निर्णय

Posted by - June 22, 2022 0
मुंबई- एकनाथ शिंदे आणि अन्य आमदारांच्या बंडखोरीने राज्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या अस्तित्वावर काळे ढग जमा झालेले आहेत. या बंडखोर आमदारांच्या…

महापालिका निवडणुकांचा फैसला पुन्हा लांबणीवर; 17 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Posted by - November 11, 2022 0
पुणे : राज्यातील महापालिकांच्या लांबलेल्या निवडणुका नक्की कधी होणार यासंदर्भातला फैसला पुन्हा लांबणीवर पडला असून सर्वोच्च न्यायालयात या संदर्भातील याचिकेवर…

मोठी बातमी : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; ९ जणांचा मृत्यू

Posted by - January 19, 2023 0
मुंबई-गोवा महामार्ग : मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे ४ ते ५ च्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. अपघातात एका चिमुकलीसह ८…
eknath shinde

Cabinet Meeting : दिवाळीनंतर पार पडलेल्या पहिल्या कॅबिनेटमध्ये घेण्यात आले ‘हे’ मोठे निर्णय

Posted by - November 17, 2023 0
मुंबई : आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची (Cabinet Meeting) बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. या बैठकीला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *