सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! मिळणार सातव्या वेतन आयोगाच्या वेतन फरकाच्या थकबाकीचा तिसरा हप्ता

261 0

मुंबई – कोरोनामुळे वर्षभर प्रलंबित ठेवण्यात आलेला सातव्या वेतन आयोगाच्या वेतन फरकाच्या थकबाकीचा तिसरा हप्ता राज्य सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जूनच्या वेतनाबरोबर ही थकबाकी देण्यात येणार आहे. सुमारे 20 लाख अधिकारी, कर्मचाऱ्यांना आणि सात लाख सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे.

ज्या सरकारी व इतर पात्र कर्मचारी, अधिकारी; तसेच सेवानिवृत्तीधारकांना एक जुलै 2021 रोजी देय असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या पगारातील थकबाकीची तिसऱ्या हप्त्याची रक्कम जूनच्या पगारात रोख अथवा भविष्य निर्वाह निधीत जमा करून देण्यात येणार आहे. थकबाकी देण्याच्या या निर्णयाचे सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संघटनांनी स्वागत केले.

भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेल्या कर्मचा-यांसह जे कर्मचारी जून 2021 ते या शासन आदेशांच्या दिनांकापर्यंत सेवानिवृत्त झाले असतील अथवा मृत्यू पावले असतील, अशा कर्मचाऱ्यांना वेतनाच्या थकबाकीच्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम रोखीने अदा करण्यात यावी. असे आदेशात म्हटले आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला़ मात्र त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी 1 जानेवारी 2019 पासून करण्यात आली.

 

Share This News

Related Post

#PUNE : विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा पुढाकार

Posted by - February 7, 2023 0
पुणे : गणेशखिंड रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू असल्याने विद्यापीठ चौकात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला…

“आम्ही निवडणूक जिंकू किंवा हरू, मात्र पैसे वाटणार नाही…!” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted by - February 26, 2023 0
पुणे : कसबा पेठ मतदारसंघात भाजपकडून पैशांचे वाटप सुरू आहे. असा आरोप करून रवींद्र धंगेकर यांनी कसबा गणपती समोर आंदोलन…

नागपूरमध्ये स्टार बसला भीषण आग, बसबाहेर पडल्यामुळे प्रवासी सुखरूप, पाहा व्हिडिओ

Posted by - May 5, 2022 0
नागपूर- नागपूरमधील संविधान चौकात स्टार बसला अचानक आग लागली. प्राथमिक माहितीनुसार बॅटरीमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत…
Rahul Eknath And Uddhav

MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेच्या निकालाअगोदर राज्यातील प्रमुख नेत्यांनी दिल्या ‘या’ प्रतिक्रिया

Posted by - January 10, 2024 0
मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ (Shiv Sena MLA Disqualification Case) झाली होती. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा…
suicide

NEET परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे विद्यार्थिनीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Posted by - June 14, 2023 0
गोंदिया : आजकाल तरुणाईमध्ये आत्महत्याचे प्रमाण खूप वाढले आहे. एका छोट्याशा अपयशामुळे ते आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. काही…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *