एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचा चौथा दीक्षांत समारंभ; 4,576 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान

631 0

पुणे : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचा चौथा दीक्षांत समारंभ विश्व सभामंडप, विश्वराजबाग, लोणी-काळभोर, पुणे येथे पार पाडला. यावेळी विद्यापीठाच्या 4, 576 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं. याप्रसंगी भारत सरकारचे परराष्ट्र व्यवहार व शिक्षण राज्यमंत्री डॉ. राजकुमार रंजन सिंग आणि इस्त्रोचे माजी अध्यक्ष व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चे अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. के. कस्तुरीरंगन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

समाजाच्या विकासासाठी आणि गुणवत्तापुरक शिक्षण प्रदान करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण महत्वाचं ठरत असतं. त्यामुळं केंद्र सरकारनं जाहीर केलेलं राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 गेम चेंजर ठरेल, असं मत भारत सरकारचे परराष्ट्र व्यवहार व शिक्षण राज्यमंत्री डॉ. राजकुमार रंजन सिंग यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केलं.

इस्त्रोचे माजी अध्यक्ष व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चे अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. के. कस्तुरीरंगन हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. समाजाच्या कल्याणासाठी आणि स्वतःचे करिअर एमआयटीतील शिक्षण मदत करेल, असं मत डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी यावेळी व्यक्त केलं.

अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड होते. मूल्याधिष्ठित शिक्षणपद्धतीनंच विद्यार्थ्यांमधून सर्वगुण संपन्न असा नागरिक निर्माण होईल आणि भविष्यात भारतीय संस्कृती जगाला मार्ग दाखवेल, असं प्रतिपादन प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी केलं.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या माध्यातून डॉ. विश्वनाथ कराड स्टार्टअप फंड दिला जाणार असून त्याचा उपयोग विद्यार्थ्यांनं स्वतःचा व्यवसाय आणि संशोधनासाठी होऊ शकणार आहे. यातून नवउद्योजक आणि संशोधक निर्माण होतील, असा विश्वास एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल कराड यांनी यावेळी व्यक्त केला.

या दीक्षांत समारंभरात बीटेक मधील केवल पद्मवार याला फाउंडर प्रेसिडेंट मेडलनं तर बॅचलर ऑफ एज्युकेशनचे मिनू कलिता यांना एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट मेडलनं गौरवण्यात आलं. या समारंभाप्रसंगी कुलगुरु डॉ. आर. एम. चिटणीस, प्र-कुलगुरु डॉ. मिलिंद पांडे, प्र-कुलगुरु प्रा. तपन पांडा, डॉ. प्रसाद खांडेकर, कुलसचिव डॉ. प्रशांत दवे परीक्षा नियंत्रक प्रा. गणेश पोकळे आदी उपस्थित होते.

Share This News

Related Post

‘या’ दिवशी होणार विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी मतदान

Posted by - May 26, 2022 0
मुंबई – महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली. 2 जून रोजी…

धक्कादायक ! रक्त पेढीतून दिलेल्या रक्तातून 4 मुलांना HIV ची लागण, एका मुलाचा मृत्यू

Posted by - May 26, 2022 0
नागपूर – ‘ब्लड बँके’तून दिलेल्या रक्तातून नागपूर जिल्ह्यातील चार मुलांना एचआयव्हीची लागण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यापैकी एका…
Darshana Pawar Murder Case

Darshana Pawar Murder Case : दर्शना पवारच्या मृत्यूचे गूढ उकलंल; खून झालेल्या दिवशीचा घटनाक्रम आला समोर

Posted by - June 20, 2023 0
पुणे : काही दिवसांपूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत (MPSC) राज्यात तिसरा क्रमांक पटाकावित वन परिक्षेत्र अधिकारीपदाला गवसणी घालणाऱ्या (आरएफओ)…

संजय राऊतांचे खळबळजनक पत्रं ! “ठाण्यातील कुख्यात गुंड राजा ठाकूर यास माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी देण्यात आली आहे…” संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीस यांना पत्र, वाचा काय आहे प्रकरण….

Posted by - February 21, 2023 0
मुंबई : खासदार संजय राऊत यांनी नुकतेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी एक मोठा…

रेल्वे थांबली म्हणून खाली उतरले आणि दुसऱ्या रेल्वेखाली चिरडले, ६ जणांचा मृत्यू

Posted by - April 12, 2022 0
अमरावती- तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे थांबलेली असताना काहीजण रेल्वेतून खाली उतरले आणि शेजारच्या ट्रॅकवरून भरधाव वेगात जाणाऱ्या रेल्वेखाली चिरडले. या अपघातात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *