Dr.Gaurav Gandhi

16 हजार हार्ट पेशंटला जीवनदान देणाऱ्या डॉक्टरचा ‘हार्ट’नेच केला घात; काय आहे नेमके प्रकरण?

798 0

अहमदाबाद : डॉक्टर म्हणजे रुग्णांसाठी देवच असतो. हे डॉक्टर कित्येकांचे प्राण ते वाचवतात. सध्या आपण अशाच एका डॉक्टरबद्दल बोलणार आहे. त्याने आपल्या कार्यकाळात 1-2 नव्हे तर 16 हजार रुग्णांचा जीव वाचवला. हृदयाची समस्या असलेल्या या रुग्णांची हार्ट सर्जरी (Heart Surgery) करून त्यांनी त्याला नवीन जीवनदान -दिले. पण या डॉक्टराचे दुर्दैव बघा. इतरांचं हृदय नीट करणाऱ्या डॉक्टराचा त्याच्याच हृदयाने घात केला आहे. या घटनेमुळे सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
ही धक्कादायक घटना गुजरातच्या जामनगरमध्ये घडली आहे. यामध्ये 41 वर्षीय हृदयरोगतज्ज्ञ डॉ.गौरव गांधी (Cardiologist Dr. Gaurav Gandhi) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. डॉ. गांधी हे एक प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट. त्यांनी त्यांच्या वैद्यकीय कारकिर्दीत 16,000 हून अधिक रुग्णांवर उपचार केले आहेत. जेव्हा डॉ. गौरव गांधींना हृदयविकाराचा झटका (Heart attack) आला तेव्हा ते त्यांच्या घरातून हॉस्पिटलसाठी निघाले होते. त्याचवेळी त्यांना छातीत दुखू लागलं आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला. हा झटका एवढा तीव्र होता कि त्यांचा रुग्णालयात पोहोचण्याच्या अगोदरच मृत्यू झाला.

डॉ. गौरव गांधी यांच्याबद्दल थोडक्यात माहिती
गौरव गांधी जामनगरच्या एमपी शाह मेडिकल कॉलेजमध्ये शिकले. जामनगरमधून एमबीबीएस आणि एमडीचं शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यानंतर त्यांनी अहमदाबादमधून डीएम कार्डिओलॉजीचे शिक्षण पूर्ण केलं. तेव्हापासून ते जामनगरमध्ये हृदय रुग्णांवर उपचार करत होते. आपल्या उत्कृष्ट वैद्यकीय सेवेमुळे त्यांनी अल्पावधीतच चांगलं नाव कमावले होतं. वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट वैद्यकीय सेवा आणि संशोधनासाठी त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या वैद्यकीय कारकिर्दीत त्यांनी 16,000 हून अधिक रुग्णांवर उपचार केले आहेत. डॉ. गांधी यांच्या माघारी पत्नी देवांशी, दहा वर्षांची मुलगी आणि पाच वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.

Share This News

Related Post

Manoj Jarange

Maratha Reservation : आधी ‘ती’ मागणी मान्य करा अन् नंतरच..; अधिवेशनापूर्वी जरांगे पाटलांची आक्रमक भूमिका

Posted by - February 20, 2024 0
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आज राज्य सरकारनं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. मात्र या अधिवेशनापूर्वीच मराठा आंदोलक मनोज…

दापोली रिसॉर्ट प्रकरणी विभास साठे यांच्या जीविताला धोका, किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली भीती

Posted by - May 31, 2022 0
मुंबई- दापोली रिसॉर्ट प्रकरणातील व्यावसायिक विभास साठे यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे. साठे यांच्या जीविताला धोका असल्याची…
Monsoon Update

Monsoon Update : शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! ‘या’ जिल्ह्यांत आज बरसणार पाऊस

Posted by - August 31, 2023 0
पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात पावसाने दडी मारल्याने (Monsoon Update) शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले…

भीमा सहकारी साखर कारखान्यात 500 कोटींचा भ्रष्टाचार; संजय राऊत यांचे फडणवीसांना पत्र, वाचा सविस्तर

Posted by - March 13, 2023 0
भीमा सहकारी साखर कारखान्यामध्ये 500 कोटी रुपयांचे मनी लॉन्डरिंग झाल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान याप्रकरणी ईडी…

आदिवासींच्या जमिनींच्या प्रश्नावरुन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विधानसभेत आक्रमक

Posted by - March 11, 2022 0
राज्यातील आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींना देण्यासंदर्भात भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करत, याबाबतचे सरकारने माहिती…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *