इंदूर दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू, १० जणांना वाचवण्यात यश

636 0

आज रामनवमीचा सण सर्वत्र उत्साहात सुरु असतानाच इंदूरच्या श्री बेलेश्वर महादेव झूलेलाल मंदिरात विहिरीवरील छत तुटल्यामुळे दर्शनासाठी आलेले २५ भाविक विहिरीत कोसळले. यामध्ये १३ जणांना आपले प्राण गमवावे लागले तर १० जणांना वाचवण्यात यश आले.

रामनवमीमुळे मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक आले होते. मंदिरात रामनवमीनिमित्त धार्मिक कार्यक्रम सुरु असताना मंदिराच्या आवारात असलेल्या विहिरीवरील छत तुटले. आणि त्यावर उभे असलेले भाविक विहिरीत कोसळले. या घटनेमुळे सर्वत्र हलकल्लोळ माजला. या घटनेत सुमारे २५ भाविक जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाने धाव घेऊन मदतकार्य सुरु केले. तत्पूर्वी विहिरीत पडलेल्या भाविकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते. दहा भाविकांना विहिरीबाहेर काढण्यात यश आलं. मात्र १३ जणांचा मृत्यू झाला.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दखल घेतली आहे. इंदूरचे जिल्हाधिकारी, इंदूरचे आयुक्त यांच्याशी फोनवर चर्चा करुन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बचाव कार्याला गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री कार्यालय इंदूर जिल्हा प्रशासनाच्या सतत संपर्कात आहे. घटनास्थळी इंदूर पोलिसांचे उच्च अधिकारी, जिल्हा प्रशासनाचे उच्च अधिकारी उपस्थित आहेत.

Share This News

Related Post

केतकीचा पाय आणखी खोलात ! 2020 चे अट्रोसिटी प्रकरणी केतकी रबाळे पोलिसांच्या ताब्यात

Posted by - May 19, 2022 0
नवी मुंबई- शरद पवार यांच्यावर फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणी वाढत आहेत. आता अट्रोसिटीच्या गुन्ह्यासाठी तिला…

नळस्टॉप दुहेरी उड्डाणपूल रविवारपासून खुला : महापौर मुरलीधर मोहोळ

Posted by - March 9, 2022 0
पश्चिम पुण्याच्या वाहतुकीला वेग येण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असणाऱ्या नळस्टॉप येथील शहरातील पहिल्या दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण येत्या रविवारी संध्याकाळी ६ वाजता…

“मराठी भाषिकांवरील अन्याय येत्या 48 तासात थांबले नाहीत तर मलाही बेळगावात…!” आणि शरद पवार संतापले

Posted by - December 6, 2022 0
बेळगाव : कर्नाटकमध्ये आज महाराष्ट्राच्या गाड्यांवर हल्ले करण्यात आले. दगडफेक आणि सातत्याने कर्नाटक सरकारकडून होणारे चितावणीखोर वक्तव्य पाहता सीमावाद आता…
Pune News

Pune News : धक्कादायक ! स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी किल्ले राजगडावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - August 16, 2023 0
पुणे : पावसाळा सुरू असल्याने पर्यटक गड (Pune News) किल्ल्यांवर, निसर्गाच्या सानिध्यात फिरायला येत असतात. यादरम्यान अनेक धक्कादायक घटना घडतात.…
Anil Parab

Sai Resort Case : अनिल परब यांना दिलासा ! साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीच्या आरोपपत्रातून नाव वगळले

Posted by - May 9, 2023 0
रत्नागिरी : दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणी (Sai Resort Case) एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी ईडीने (ED)…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *