Breaking News ! महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताचे 11 बळी

1311 0

आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यासाठी खारघर येथे आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात उष्माघातामुळे 11 श्री सेवकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यापैकी अनेकजण अत्यस्वस्थ आहेत. कडक उन्हात दोन तास बसल्यामुळे मळमळ, उलट्या आणि जुलाब सुरू झाल्याने या श्रीसेवकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यातील 11 जण दगावले. मृतांमध्ये महिलांची संख्या अधिक आहे.

ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार घोषित केल्यानंतर काल रविवारी या पुरस्काराचा वितरण सोहळा नवी मुंबईच्या खारघरमध्ये आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला गालबोट लागल्याची दुर्दैवी घटना घडली. हा कार्यक्रम भर उन्हात झाल्याने उन्हाच्या तीव्रतेमुळे अनेकांना उष्मघाताचा त्रास झाला. त्यामध्ये ११ जण दगावले.
तर अनेकजण अत्यस्वस्थ आहेत.

कडक उन्हात दोन तास बसल्यामुळे मळमळ, उलट्या आणि जुलाब सुरू झाल्याने या श्रीसेवकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यातील 11 जण दगावले. मृतांमध्ये महिलांची संख्या अधिक आहे. सध्या एमजीएम रुग्णालयातील आणखी 4 जण हे अतिदक्षता विभागात तर 20 जण जनरलवॉर्डमध्ये उपचार घेत आहेत तर अतिदक्षता विभागातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची सूत्रांची माहिती आहे.

उष्माघाताने त्रस्त झालेल्या सदस्यांना नवी मुंबई कळंबोली येथील एमजीएम रुग्णालय, टाटा रुग्णालय, नवी मबाई महापालिका रुग्णालय तसेच उपजिल्हा रुग्णालय यासह अन्य रुग्णालयात दाखल करून उपचार करून सोडून देण्यात आले आहे.

मृतांची नावे

01. तुळशीराम भाऊ वागडे वय 58, जांभूळ विहीर ता. जव्हार

02. जयश्री जगन्नाथ पाटील वय 54, रा. वारळ पो. मोदडी ता. म्हसळा

03. महेश नारायण गायकर वय 42, रा. मेदडू ता. म्हसळा

04. मंजुषा कृष्णा भोगडे, रा. भुलेश्वर मुंबई

05. भीमा कृष्णा साळवे, वय 58, रा. कळवा ठाणे

06. सविता संजय पवार, वय 42, रा. मंगळवेढा, सोलापूर

07. स्वप्नील सदाशिव किणी, वय 32, रा. विरार

08. पुष्पां मदन गायकर, वय 63. कळवा, ठाणे

09. वंदना जगन्नाथ पाटील, वय 62, रा. माडप. ता. खालापूर

10. कलावती सिद्धराम वायचल, रा. सोलापूर

11 अनोळखी

उद्धव ठाकरे रुग्णांच्या भेटीला..

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस केली. तसेच मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी डॉक्टरांशी चर्चा करून रुग्णांवरील उपचाराचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी कार्यक्रमाच्या ढिसाळ नियोजनावर टीका करतानाच भाजपचे नेते अमित शाह यांच्यावरही निशाणा साधला. उद्धव ठाकरे म्हणाले की, नागपूरहून आल्यावर या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर थेट इथेच आलो. जखमींची विचारपूस केली. चारपाच जणांशी बोललो. दोनजण गंभीर आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कार्यक्रमाची चुकीची वेळ कोणी दिली आणि कशी दिली? ढिसाळ नियोजनामुळे चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लागलं. घटना दुर्देवी आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

कार्यक्रमाची वेळ बदलण्यात आल्याची चर्चा

भाजपचे नेते अमित शाह यांना गोव्याला जायचं होतं त्यामुळे कार्यक्रमाची वेळ बदलण्यात आल्याची चर्चा आहे. याकडे उद्धव ठाकरे यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. या घटनेची चौकशी करतील की नाही माहीत नाही. तुम्ही म्हणालात तसं अमित शाह यांना जायचं होतं म्हणून कार्यक्रम भर दुपारी घेतला गेला असेल तर चौकशी कोण कुणाची करणार? असा सवाल करतानाच निरपराध जीव गेले आहेत. उगाचच एका चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लागलं आहे. आम्हाला धर्माधिकारी कुटुंबाचा अभिमान आहे. अनेक पिढ्यांपासून धर्माधिकारी कुटुंब काम करत आहे. त्या कार्यक्रमाला केवळ अमित शाह यांना वेळ नव्हती म्हणून दुपारची वेळ घेतली असेल तर विचित्र आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

दरम्यान, कार्यक्रमाची वेळ ही स्वत: धर्माधिकारी यांनी दिली होती असे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या सांगितले आहे

मुख्यमंत्री म्हणाले….

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री 8 वाजता कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात जाऊन उपचार घेणाऱ्या रुग्णांची विचारपूस केली. तसेच डॉक्टरांकडून सर्व माहिती घेतली. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित काही श्री सदस्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात हलवावे लागले. दुर्दैवाने त्यातील अकरा जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मी या श्री सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ही अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी घटना आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

Share This News

Related Post

धक्कादायक : पुण्यात एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या; असे काय घडले ? वाचा सविस्तर

Posted by - January 14, 2023 0
पुणे : पुण्यातील केशवनगर भागातून एक धक्कादायक बातमी समोर आली आणि संपूर्ण पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. केशवनगर भागात राहणाऱ्या एकाच…

इलेक्ट्रिक हायवे म्हणजे काय ? भारतामध्ये कुठे बांधला जाणार ? जाणून घ्या

Posted by - April 6, 2022 0
इलेक्ट्रिक हायवे- देशात सतत वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमुळे हैराण झालेल्या लोकांसाठी भारत सरकारने मोठी बातमी आणली आहे. ही…
Maratha Reservation

Maratha Reservation : ‘देवेंद्र फडणवीस भाजपमध्ये आहेत तोपर्यंत मतदान करणार नाही’; सोलापुरमध्ये मराठा समाजाने घेतली शपथ

Posted by - March 3, 2024 0
सोलापूर : सोलापुरमध्ये मराठा समाज (Maratha Reservation) पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. सोलापुरातल्या एका गावात मराठा समाजाने भाजपा आणि मित्र…
Traffic News

Traffic News : मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी; पुण्यात लांबच लांब रांगा

Posted by - July 19, 2023 0
पुणे : मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर आज पुन्हा एकदा वाहतूक कोंडी (Traffic News) झाल्याचे पाहायला मिळत आहे. सुमारे 3 किलोमीटर लांबपर्यंत…
Manohar Joshi

Manohar Joshi : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन

Posted by - February 23, 2024 0
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्याने आज पहाटे तीनच्या सुमारास निधन झाले ते…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *