Result

दहावीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनी मारली बाजी

385 0

पुणे : नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. हि परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च दरम्यान पार पडली होती. यंदा 15 लाख नियमित विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. या वर्षीचा दहावीचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. निकालात यंदाही कोकण विभागाने अव्वल स्थान पटकावले आहे.

Result

कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 98.11 टक्के लागला आहे. पुणे विभागाचा निकाल 95.64 टक्के लागला आहे. तर सर्वात कमी नागपूर विभागाचा निकाल आहे. नागपूर विभागाचा निकाल 92.05 टक्के लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत 3.11 टक्क्यांनी दहावीचा निकाल घटला आहे.

कुठे पहाल निकाल?
www.mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org

https://ssc.mahresults.org.in

www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होणार आहे. तर www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होणार आहे.

SSC Result 2023 : असा पाहा निकाल
स्टेप 1) दहावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा.
स्टेप 2) दहावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3) तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरा.
स्टेप 4) दहावीचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

महाराष्ट्र बोर्डाच्या http://verification.mh-ssc.ac.in या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करता येणार आहे. राज्यातील 43 शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. राज्यातील 29 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तर 14 जून रोजी दुपारी विद्यार्थ्यांना आपली गुणपत्रिका प्राप्त होणार आहे.

10 वी परीक्षाला एकूण 15 लाख 29 हजार 666 विद्यार्थी बसले होते त्यापैकी 14 लाख 34 हजार 898 विद्यार्थी पास झाले. म्हणजेच टक्केवारी 93.83 इतकी आहे. राज्यात 151 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत.

Share This News

Related Post

Pune News

Pune News : पुण्यात पाटील इस्टेट परिसरात भाजप – काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले

Posted by - May 13, 2024 0
पुणे : पहिल्या तीन टप्प्यांनंतर आज देशभरात चौथ्या टप्यातील मतदान (Lok Sabha) पार पडत आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 मतदारसंघातील…
Devendra Fadanvis

Maratha Reservation : ‘मराठ्यांना कुणबीमधून आरक्षण देणार नाही’, फडणवीसांचे मोठं वक्तव्य

Posted by - October 13, 2023 0
वाशिम : मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र (Maratha Reservation) देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी घेऊन केलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर…

कसबा पेठ विधानसभा मतमोजणी केंद्राला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची भेट

Posted by - February 28, 2023 0
पुणे : कोरेगाव पार्क येथील भारतीय अन्न महामंडळ गोदाम येथे कसबापेठ विधानसभा मतदार संघ मतमोजणी केंद्राला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख…
pune-police

पोलीस आयुक्तालयात दोन उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या; तर सात पोलीस उपायुक्त नवनियुक्त

Posted by - November 15, 2022 0
पुणे : पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये दोन पोलीस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. तर नव्यानेच बदलून आलेल्या सात पोलीस उपायुक्तांच्या…

“Ego उद्धव ठाकरेंना नाही , देवेंद्र फडणवीस यांनाच आहे …!” सुनील राऊत यांची सडेतोड प्रतिक्रिया

Posted by - August 12, 2022 0
मुंबई : कांजूर मार्गामध्ये मेट्रोची कार शेड केली जात होती. ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या इगोमुळे अशी टीका उपमुख्यमंत्री…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *